esakal | पाकने 'RAW' वर केला हाफिजच्या घराबाहेर बॉम्बस्फोट घडवल्याचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

Hafiz-Saeed

पाकने 'RAW' वर केला हाफिजच्या घराबाहेर बॉम्बस्फोट घडवल्याचा आरोप

sakal_logo
By
दीनानाथ परब

लाहोर: मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदच्या (Hafiz Saeed) लाहोरमधील (lahore blast) घराजवळ मागच्या आठवड्यात कार बॉम्बस्फोट (car bomb) झाला होता. हा बॉम्बस्फोट रिसर्च अँड अ‍ॅनलिसिस विंग म्हणजेच RAW ने घडवून आणल्याचा आरोप पाकिस्तानने (Pakistan) केला आहे. RAW ही भारताची बाह्य गुप्तचर संघटना आहे. परदेशात भारताविरोधात रचल्या जाणाऱ्या कारस्थानांची माहिती गोळा करण्याची जबाबदारी 'रॉ' वर आहे. (Pakistan blames RAW for blast outside Hafiz Saeed home)

लाहोरमध्ये हाफिजच्या घराबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात तीन जण ठार झाले होते, तर २४ जणांचा मृत्यू झाला होता. लाहोरमधल्या स्फोटासंदर्भात पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये रहस्यमयी ड्रोन उडत असल्याचे भारताकडून जे सांगितले जातेय, तो लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे, असे पाकिस्तानचे NSA डॉ. मोईद युसूफ म्हणाले.

हेही वाचा: पुरेसा निधीच मिळाला नाही त्यामुळे हॉस्पिटलने निवडला बोगस लसींचा मार्ग!

"लाहोरमधल्या स्फोटाचे टेलिफोन रेकॉर्डसह आर्थिक व्यवहाराचे असे ठोस पुरावे आमच्याकडे आहेत. हे सर्व पुरावे भारतातून हा हल्ला प्रायोजित करण्यात आल्याचे संकेत देत आहेत" असे डॉ. मोईद युसूफ म्हणाले. या पत्रकार परिषदेनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बॉम्बस्फोटाचे पुरावे गोळा केल्याबद्दल तपास यंत्रणांचे कौतुक केले व जागतिक समुदायाला भारताच्या वर्तनाची दखल घेण्याचे आवाहन केले.

loading image
go to top