
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानने भारताच्या अनेक शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय संरक्षण यंत्रणेमुळे त्यांचे मनसुबे धुळीस मिळाले. ही परिस्थिती पाहता, 1971 च्या युद्धापूर्वीच्या वातावरणाची आठवण होते. त्यावेळी भारताने पाकिस्तानचा पूर्वेकडील भाग, म्हणजेच आजचा बांगलादेश, स्वतंत्र करून इतिहास घडवला होता. सध्या पाकिस्तान ज्या प्रकारे आक्रमक धोरण अवलंबत आहे, ते पाहता भारत पुन्हा निर्णायक पाऊल उचलू शकतो का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.