

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला ३ दिवस उलटलेत. पंतप्रधान मोदींनी बिहारमधल्या मधुबनीतून अतिरेक्यांना कठोर शब्दात खडेबोल सुनावलेत. भारतानं हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानविरुद्ध कठोर निर्णय घेतलेत. त्यात भारतानं सिंधू पाणीवाटप कराराला स्थगिती दिली. त्यानंतर पाकिस्ताननं शिमला करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. शिमला करार म्हणजे भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांमध्ये झालेल्या शांतता कराराचा एक भाग आहे. तरी, हा शिमला करार नेमका काय? ते सविस्तर समजून घेऊयात. त्यात हा करार रद्द केल्यास भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांवर काय परिणाम होऊ शकतात.