esakal | भारताला मदत करण्यासाठी पाकिस्तानमधून मोदींना पत्र; #PakistanWithIndia ट्विटरवर ट्रेंड

बोलून बातमी शोधा

भारताला मदत करण्यासाठी पाकिस्तानमधून मोदींना पत्र; #PakistanWithIndia ट्विटरवर ट्रेंड

भारताला मदत करण्यासाठी पाकिस्तानमधून मोदींना पत्र; #PakistanWithIndia ट्विटरवर ट्रेंड

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : देशात कोरोनाचं संकट सध्या घोंघावतंय. परिस्थिती फारच चिंताजनक असून जगभरातून याबाबत चिंता आणि काळजी व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात पाकिस्तानातील नागरिकांनीही भारताविषयी काळजी व्यक्त केली आहे. या संकटाच्या समयी पाकिस्तानने भारताला मदत करावी, अशी मागणी पाकिस्तानी नागरिकांकडून करण्यात येत आहे. #IndianLivesMatter #IndiaNeedOxygen #PakistanWithIndia असे हॅश्टॅग ट्रेड करत आहेत. या दरम्यानच पाकिस्तानचे समाजवेक अब्दुल सत्तार इदी यांचा मुलगा फैजल इदीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं आहे. त्यांनी भारतातील वाढत्या कोरोना संक्रमणाबाबत चिंता व्यक्त केली आहे तसेच मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

हेही वाचा: Corona झाला असेल वा झाल्याची शंका असेल; वाचा काय करावे आणि काय करु नये

50 ऍब्युलन्स पाठवण्याची मदत

फैजल यांनी आपल्या पत्रात लिहलंय की, हम इदी फाउंडेशनमध्ये भारतातील कोरोनाचा हाहाकार पाहत आहोत. मोठ्या संख्येने लोक कोरोनाच्या विळख्यात अडकत असल्याचं पाहून आम्ही चिंतीत आहोत. त्यांनी पुढे याबाबत संवेदना व्यक्त करत सोबतच 50 ऍब्युलन्स देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

भारतात टीम पाठवण्याची इच्छा

त्यांनी म्हटलंय की, त्यांच्या टीममध्ये टेक्निशियन्स, ऑफिस स्टाफ, ड्रायव्हर्स आणि सपोर्ट स्टाफ समाविष्ट असेल आणि त्यांच्या सर्व गरजांची पूर्तता फाउंडेशनकडूनच करण्यात येईल. यासाठी त्यांनी भारतात येण्याची परवानगी आणि स्थानिक पोलिस प्रशासनाची मदत मागितली आहे. परवानगी मिळताच ते स्वत: भारतात येण्यास इच्छुक आहेत.

भारतात काल 3,46,786 नवे रुग्ण सापडले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून देशात तीन लाखांच्या पार दैंनदिन रुग्णसंख्या आढळत आहे. काल शुक्रवारी देखील देशात सुमारे साडेतीन लाख नवे रुग्ण आढळले आहेत तर तब्बल अडीच हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या कहराने डोकं वर काढलं आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर अभूतपूर्व असा ताण निर्माण झाला आहे. देशात ऑक्जिनची कमतरता भासत असून अनेक रुग्णांना त्याअभावी प्राण देखील गमवावे लागत आहे.