esakal | पाकिस्तानवर मोठी नामुष्की; 'या' यादीतील नाव कायम?
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan to remain in FATFs terror financing grey list

आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एक मोठा झटका बसला असून दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांच्या यादीत पाकिस्तानचे नाव कायम आहे. फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सच्या ग्रे यादीमध्ये पाकिस्तानचे नाव कायम राहणार आहे.

पाकिस्तानवर मोठी नामुष्की; 'या' यादीतील नाव कायम?

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कराची : आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एक मोठा झटका बसला असून दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांच्या यादीत पाकिस्तानचे नाव कायम आहे. फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सच्या ग्रे यादीमध्ये पाकिस्तानचे नाव कायम राहणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात एफएटीएफची बैठक पार पडली होती. त्यावेळीही या यादीतून बाहेर पडण्यास पाकिस्तानला अपयश आलं होतं. त्यानंतर त्यांना एप्रिलपर्यंतची वेळ देण्यात आली होती. परंतु, लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत पुरवण्याचा आरोप पाकिस्तानवर करण्यात आला असून त्यांना हा दावा खोटा ठरवता आला नाही.
---------
डॉ. कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश, कोरोना चाचण्यांची संख्या वाढणार
---------
पाकिस्तानला २७ पॉईंट अॅक्शन प्लॅनवर काम करण्यासही सांगण्यात आलं होतं. परंतु, पाकिस्तानला त्यातही अपयश आलं आहे. दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या कारणावरून एफएटीएफने मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानला ग्रे यादीत टाकण्याचा निर्णय घेतला होता. दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत करणाऱ्यांना पाकिस्तान समर्थन देत असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर एफएटीएफच्या दबावामुळे केवळ दाखवण्यासाठी पाकिस्ताननं काही दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई केली होती.

दरम्यान, लष्कर आणि जैश ए मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनांना पोहोचणारी आर्थिक मदत थांबवण्यात पाकिस्तान अपयशी ठरल्यानेच एफएटीएफने हा निर्णय घेतला आहे. चीनच्या शिय्यामिन लियू यांच्या अध्यक्षतेखाली काल (ता. २४) बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एफएटीएफच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत पाकिस्तानला ग्रे यादीत ठेवायचं की काळ्या यादीत टाकायचं यासंदर्भात चर्चा करण्यात येणार होती. मात्र त्यांना ग्रे यादीत कायम ठेवण्यात आलं आहे.

loading image
go to top