पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव

वृत्तसंस्था
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तान वेगवेगळ्या पध्दतीने भारताच्या या निर्णयाचा निषेध करत आहे. काश्मीरचा मुद्दा पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघात मांडला. मात्र त्याठिकाणी पाकिस्तानला निराशाच मिळाली. तरी देखील पाकिस्तान आपल्या अडमुठेपणावर कायम आहे. आता पाकिस्तानने काश्मीर प्रकरणी हेग स्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तान वेगवेगळ्या पध्दतीने भारताच्या या निर्णयाचा निषेध करत आहे. काश्मीरचा मुद्दा पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघात मांडला. मात्र त्याठिकाणी पाकिस्तानला निराशाच मिळाली. तरी देखील पाकिस्तान आपल्या अडमुठेपणावर कायम आहे. आता पाकिस्तानने काश्मीर प्रकरणी हेग स्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी सांगितले की, 'आम्ही काश्मीर प्रकरणी हेग स्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्व कायदेशीर बाबींचा विचार करूनच आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याचा निर्णय आम्ही घेतला', असल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानमधील एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ही माहिती दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan to take Kashmir dispute to International Court of Justice after Article 370 move