esakal | 'शशी थरुरांसारखं इंग्रजी बोलण्याची रेसीपी'; पाकिस्तानी कॉमेडीयनच्या भन्नाट व्हिडीओला हटके उत्तर

बोलून बातमी शोधा

shashi tharoor english}

शशी थरुर यांच्यासारखं अस्खलित इंग्रजी कसं बोलावं, याची रेसीपीच त्याने या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितली आहे. 

'शशी थरुरांसारखं इंग्रजी बोलण्याची रेसीपी'; पाकिस्तानी कॉमेडीयनच्या भन्नाट व्हिडीओला हटके उत्तर
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या इंग्रजीवरुन ते सातत्याने चर्चेत असतात. त्यांचं अस्खलित इंग्रजी बोलणं अनेकांना भुरळ पाडतं. त्यांच्या या कौशल्यामुळे ते सतत चर्चेत असतात. अनेक नवनव्या इंग्रजी शब्दांचा वापर ते आपल्या लिखाणात आणि भाषणात वापरुन भूरळ पाडताना दिसतात. सोशल मीडियावर वरचेवर यावरुन चर्चा होताना दिसते. काही दिवसांपूर्वी त्यांनी पाकिस्तानातील सिव्हिल सर्व्हिसेसच्या पेपरमध्ये चूक काढली होती. आणि आता एका पाकिस्तानी कॉमेडीयनने त्यांची नक्कल करणारा एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. शशी थरुर यांच्यासारखं अस्खलित इंग्रजी कसं बोलावं, याची रेसीपीच त्याने या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितली आहे. 

अकबर चौधरी असं या पाकिस्तानी कॉमेडियनचं नाव आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अकबरने कॅप्शनमध्ये लिहलंय की, थरुर यांच्याप्रमाणे इंग्रजी कसे बोलाल? या कॉमेडीयनने कसलीही चूक न करता शशी थरुर यांच्याप्रमाणे इंग्रजी कसे बोलले जाऊ शकते याच्या तीन फनी स्टेप्स सांगितल्या आहेत. 

हेही वाचा - ब्रेकिंग : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनाची लस

इंग्रजी बोलण्याच्या तीन फनी स्टेप्स
व्हिडीओमध्ये दिसतंय की कॉमेडीयन सर्वांत आधी ऑक्सफर्ड डिक्शनरीची एक कॉपी ज्यूसरमध्ये टाकून त्याचा ज्यूस बनवून पितो. त्यांनंतर एका सोफ्यावर बसून तो थरुर यांच्या व्हिडीओला सलाईनप्रमाणे स्वत:ला चढवतो. त्यानंतर तो डिक्शनरीला कूटून त्याची पावडर नाकाने ओढतो. इतकं सगळं केल्यानंतर तो शशी थरुर यांच्याप्रमाणे अगदी उत्तमपणे इंग्रजी बोलताना दिसतो. शशी थरुर यांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र, त्यांनी या पाकिस्तानी कॉमेडीयनला एक खोचक सल्ला देखील दिला आहे. त्यांनी म्हटलंय की, आता पुढचा व्हिडीओ पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्यावर देखील बनवा.