पाकिस्तानी ड्रोन लष्कराने पाडले

जम्मू आणि काश्‍मीरमध्ये घातपाताचा प्रयत्न उधळला
Dron
DronSakal

जम्मू - जम्मू आणि काश्मीरमधील कथुआ जिल्ह्यात रविवारी मोठ्या प्रमाणावर स्फोटके असलेला पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात सुरक्षा दलांना यश आले. त्यामुळे, घातपाताचा मोठा प्रयत्न उधळला गेला आहे. आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केलेल्या या ड्रोनला सुरक्षा दलांनी लक्ष्य केले. या ड्रोनमध्ये सुमारे प्रत्येकी सात चुंबकीय बॉम्ब तसेच ग्रेनेड लाँचर सापडले.

आज सकाळी कथुआ जिल्ह्यातील राजबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी तल्ली हरिया चाक भागात हे ड्रोन घिरट्या घालताना दिसले. त्यानंतर, पोलिसांनी ड्रोनवर गोळीबार केला. त्यानंतर, या गोळीबारामुळे ड्रोन जमिनीवर कोसळले. बॉम्बशोधक पथकाने पाहणी केल्यानंतर ड्रोनमध्ये जोडलेले प्रत्येकी सात चुंबकीय बॉम्ब आणि ग्रेनेड लाँचरही सापडले. ही सर्व स्फोटके जप्त करण्यात आली असून यासंदर्भात पुढील तपास सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com