जम्मूमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर पहिल्यांदाच महिला घुसखोर ठार

Pakistani woman intruder shot dead
Pakistani woman intruder shot dead

भारतीय लष्कराने आरएसपुरा भागात एका महिला पाकिस्तानी घुसखोराला ठार केले (Pakistani woman intruder shot dead) आहे. यासोबतच परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमेपलीकडून काही लोकांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. या भागात गस्त घालणाऱ्या जवानांना संशयास्पद हालचाल दिसल्यानंतर त्यांनी त्यांना इशारा दिला, मात्र घुसखोरांकडून त्याकडे दुर्लक्ष केले.

जेव्हा घुसखोर भारतीय हद्दीत पोहोचले तेव्हा सैनिकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला पण ते पळू लागले. दरम्यान, गोळी लागल्याने एकाचा मृत्यू झाला. शोध मोहिमेनंतर मृत व्यक्ती एक घुसखोर एक महिला असल्याचे समोर आले. याबाबत पुढील तपास केला झात आहे.

बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, आरएसपुरा सेक्टरमध्ये एका महिला पाकिस्तानी घुसखोराला गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे. संशयास्पद हालचालीनंतर बीएसएफच्या जवानांनी घुसखोराला अनेक वेळा आयबी ओलांडू नका, असे बजावले, परंतु ते कुंपणाच्या दिशेने पुढे येत राहिले.

Pakistani woman intruder shot dead
'सोव्हिएत युनियन कोसळल्यानंतर मला टॅक्सी चालवावी लागली'- पुतिन

पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगीतले की, काही दहशतवादी घुसखोरी करण्यात यशस्वी झाले आहेत. लवकरच त्यांचा शोध घेऊन त्यांना रोखले जाईल . उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना शोक व्यक्त करण्यासाठी डीजीपी दिलबाग सिंग शनिवारी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले.त्यांच्यासोबत काश्मीर रेंज आयजीपी विजय कुमार, डीआयजी एनकेआर, पोलिस, आर्मी आणि सीआरपीएफचे इतर अधिकारी होते. या दहशतवादी हल्ल्यात सोपोरचे ड्रायव्हर मोहम्मद सुलतान आणि लोलापुरा लोलाब कुपवाडा येथील फय्याज अहमद हे शहीद झाले.

डीजीपी म्हणाले की लोकांच्या सुरक्षेसाठी आणि दहशतवादविरोधी कारवायांमध्ये पोलीस लष्कर आणि निमलष्करी दलांच्या समन्वयाने काम करतात. त्यामुळे दहशतवादी पोलिसांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत असतात. बांदीपोरा हल्ल्याबाबत ते म्हणाले की, हल्ल्याशी संबंधित काही माहिती मिळाली आहे, ज्यावर पोलीस काम करत आहेत. उत्तर काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांच्या संख्ये विषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डीजीपी म्हणाले की, उत्तर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची संख्या जास्त नाही आणि उत्तर काश्मीरमध्ये सातत्याने कारवाई सुरू आहे.

Pakistani woman intruder shot dead
व्हॉट्सअ‍ॅपचे नवे प्रायव्हसी फीचर; स्टॉकर्सपासून मिळेल सुटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com