Pakistan: काश्मिरमध्ये दहशत माजवण्याचा पाकिस्तानचा कट; भारताने केला डिकोड

Terror Attack: .स्वातंत्र्य दिनाच्या आसपास हा हल्ला त्यांना करायचा होता.यासाठी त्यांनी घुसखोर दहशतवादी भारतात पाठवल्याचे म्हटले जात आहे.
काश्मिरमध्ये दहशत माजवण्याचा पाकिस्तानचा कट; भारताने केला डिकोड
Pakistan sakal

Terror Attack Plan in Kashmir : भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून भारतावर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याचा प्लॅन डिकोड केला असल्याचे वृत्त समोर येत आहे.नुकताच कश्मीरमधील कटूवा या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला.यामध्ये पाच जवान शहीद झाले. हा दहशतवादी हल्ला मोठ्या प्लॅनचा एक भाग असल्याचे म्हटले जात आहे. जम्मू कश्मीर मध्ये होत असलेल्या दहशतवाद विरोधी कारवाईमुळे हाताश झालेल्या दहशतवादी संघटनांनी हा कट रचल्याचे म्हटले जात आहे.याबाबत एका वृत्त संस्थेने मोठा खुलासा केला आहे

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान मधील दहशतवादी संघटनांनी भारतावर मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा प्लॅन केला होता.स्वातंत्र्य दिनाच्या आसपास हा हल्ला त्यांना करायचा होता.यासाठी त्यांनी घुसखोर दहशतवादी भारतात पाठवल्याचे म्हटले जात आहे.

काश्मिरमध्ये दहशत माजवण्याचा पाकिस्तानचा कट; भारताने केला डिकोड
Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा भूकंप! PCBने 'या' दोन दिग्गजांना दाखवला घरचा रस्ता

जम्मू कश्मीरमध्ये भारताने मिशन ऑल आऊट हातात घेतल्याने तिथे दहशतवादाचा चांगलाच आळा बसला आहे.याची खंत दहशतवादी संघटनांना असून या ठिकाणी पुन्हा एकदा दहशत वाढवण्याचा प्रयत्न या संघटना करत आहेत. त्यासाठीच काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याचा त्यांचा प्लॅन आहे.

आधीपासूनच दहशतवाद्यांच मुख्य लक्ष हे श्रीनगर राहिलं आहे. मात्र आता ते आपले लक्ष श्रीनगरहून जम्मू कडे वळवत आहेत. याचं कारण म्हणजे भारताने या ठिकाणी दहशतवादावर मोठा वचक निर्माण केला आहे

भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट करण्यासाठी पाकव्याप्त कश्मीर मधील रावलकोट तुरुंग काही दिवसांपूर्वी फोडण्यात आलं. या ठिकाणी वीस दहशतवादी पळून गेले होते. ज्यातील चार ते सहा दहशतवादी हे भारतात आल्याची माहिती समोर येत आहे.

काश्मिरमध्ये दहशत माजवण्याचा पाकिस्तानचा कट; भारताने केला डिकोड
Pakistan Cricket: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तब्बल 5 संघ करणार पाकिस्तान दौरा, पाहा पुढच्या सात महिन्यांचं शेड्युल

या जेल ब्रेकमधून गाझी शहजाद अहमद सुद्धा फरार झाल्याचे म्हटले जात आहे. गाझी अहमद हा कुप्रसिद्ध दहशतवादी असून तो जेलमधनं बाहेर येणं हे भारतासाठी एक प्रकारची धोक्याची घंटा आहे.

दुसरीकडे 40 दहशतवाद्यांनी अलीकडेच भारतामध्ये घुसखोरी केली असल्याचे म्हटले जात आहे.भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर डझनभर नाले आहेत. ज्या नाल्यांचा हे दहशतवादी घुसखोरी करण्यासाठी उपयोग करतात असे म्हटले जाते.बाबर नाला, पूज नाला, बसंतर नाला, हे मुख्य नाले आहेत ज्यांचा वापर दहशतवादी जम्मूमध्ये पोहोचण्यासाठी करत आहेत.

असे जरी असलेले तरीदेखील भारताने पाकिस्तानचा हा प्लॅन डी कोड केला आहे यामुळे आता भारतासमोर या दहशतवाद्यांना एक एक करून मारण्याचे आव्हान आहे.

काश्मिरमध्ये दहशत माजवण्याचा पाकिस्तानचा कट; भारताने केला डिकोड
Pakistan Mob Lynching: पाकिस्तानात पर्यटकाला जिवंत जाळलं! महिन्याभरात ईशनिंदेची घडली दुसरी घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com