गुजरात किनाऱ्यावर पाकिस्तानी बोट जप्त; 10 जण ताब्यात | Indian coast guard | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian coast guard
गुजरात किनाऱ्यावर पाकिस्तानी बोट जप्त; 10 जण ताब्यात

गुजरात किनाऱ्यावर पाकिस्तानी बोट जप्त; 10 जण ताब्यात

गुजरात : गुजरातच्या अरबी समुद्रात (Gujrat Arabian sea) फिरणाऱ्या पाकिस्तानी यासीन बोटीला (yaseen boat apprehended) भारतीय तटरक्षक दलानं (Indian coast guard) पकडलं असून त्या बोटीत असलेल्या १० जणांना ताब्यात घेतलं आहे. शनिवारी रात्री तटरक्षक दलाचे जवान समुद्रात पहारा करत होते. त्यावेळी त्यांच्यापासून ६-७ मैल अंतरावर यासीन बोट संशयास्पदरित्या समुद्रात फिरत होती. (Pakistani yaseen boat in gujrat arabian sea apprehended by Indian coast guard )

yaseen boat

yaseen boat

दरम्यान, पाकिस्तानी बोटीत असलेल्यांनी भारताच्या अंकित बोटीला पाहिल्यावर त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारताच्या तटरक्षक दलानं वेळीच त्यांच्या मुसक्या आवळल्या. अशी माहिती गुजरातच्या संरक्षण विभागाच्या जनसंपर्क कार्यालायाकडून ट्विटरवर देण्यात आलीय.

दरम्यान, तटरक्षक दलाच्या कारवाईत पाकिस्तानच्या यासीन बोटीतून तब्बल दोन हजार किलो मासे आणि ६०० लीटर इंधन हस्तगत करण्यात आलं आहे. या बोटीत असलेल्या सर्व व्यक्तींकडे कोणतीही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे यासीन बोटीत असणाऱ्या सर्वांना गुजरातच्या पोरबंदर येथे पुढील तपासासाठी नेण्यात आलं आहे. अशी माहिती भारतीय तटरक्षक दलाने दिली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top