नूपुर शर्मांना मारण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या युवकाला अटक

भाजपच्या निलंबित नेत्या नूपुर शर्मा यांना जीवे मारण्यासाठी घुसखोरी केलेल्या पाकिस्तानच्या युवकाला राजस्थानमध्ये अटक करण्यात आली
Pakistani youth who infiltrated to kill Nupur Sharma arrested in Rajasthan
Pakistani youth who infiltrated to kill Nupur Sharma arrested in Rajasthanesakal
Updated on

नवी दिल्ली : भाजपच्या निलंबित नेत्या नूपुर शर्मा यांना जीवे मारण्यासाठी घुसखोरी केलेल्या पाकिस्तानच्या युवकाला राजस्थानमध्ये अटक करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात १६ जुलै रोजी श्रीगंगानगर जिल्ह्यातील हिंदूमलकोट येथील सीमा चौकीपाशी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्याला पकडण्यात आले. गस्तीवरील पथकाला त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे त्याला तातडीने ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या एका अधिकाऱ्याने दिली. त्याच्याकडे ११ इंच लांबीचा सुरा, धार्मिक पुस्तके, कपडे, खाद्यपदार्थ, वाळू अशा वस्तू सापडल्या. आपले नाव रिझवान अश्रफ असे असून उत्तर पंजाबमधील मंडी बहाउद्दीन शहराचा रहिवासी असल्याचा दावा तो करतो.

गुप्तचर विभाग आणि इतर तपास यंत्रणांचे संयुक्त पथक त्याची चौकशी करीत आहे. यात `रॉ‘ आणि लष्कराच्या संस्थांचे अधिकारीही आहेत. प्राथमिक चौकशीत त्याने प्रेषित महंमद पैगंबर यांच्या अवमानप्रकरणी नूपुर यांना ठार मारण्यासाठी आल्याची कबुली दिली. कट अमलात आणण्यापूर्वी अजमेर दर्ग्याला भेट देण्याची इच्छा होती, असेही त्याने अधिकाऱ्यांना सांगितले.

नूपुर शर्मा यांना अटकेपासून दिलासा

प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबद्दल अनुद्गार काढणाऱ्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना न्यायालयाच्या पुढील सुनावणीपर्यंत कोणत्याही राज्याच्या पोलिसांनी अटक करू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. यामुळे शर्मा यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी १० ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. न्या. सूर्यकांत आणि न्या. जे बी. पारडीवाला यांच्या पीठासमोर सुनावणी झाली.

नूपुर यांच्याविरोधात महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, तेलंगण यांसह नऊ राज्यांत गुन्हे दाखल झाले आहेत. या साऱ्या याचिका एकत्रित करून दिल्लीत सुनावणी घ्यावी, अशी याचिका शर्मा यांनी केली होती. याच याचिकेवर न्यायालयाने यापूर्वीच्या सुनावणीत शर्मा यांना चांगलेच फटकारले होते आणि याबाबत उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले होते. त्याच पीठासमोर आज सुनावणी झाली. ‘तुम्हाला या न्यायालयातून त्या न्यायालयात, या राज्यातून त्या राज्यात जावे लागावे, असे आम्हाला वाटत नाही. तुम्हाला कायदेशीर पर्यायांचा मार्ग चोखाळण्याची संधी मिळावी, असे तुमचे म्हणणे आहे. हा प्रत्येक नागरिकाचाच अधिकार आहे,’ असे न्यायालयाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com