Scrapped JF-17 Fighter Jet : पाकिस्तानची झाली पोलखोल : इराक चीनचं भंगार झालेलं JF-17 लढाऊ विमान खरेदी करणार नाही

इराकी सरकार लवकरच पाकिस्तान सरकारकडून 12 जेएफ-17 थंडर ब्लॉक-3 लढाऊ विमाने खरेदी करणार
scrapped JF-17 fighter jet
scrapped JF-17 fighter jet esakal

Scrapped JF-17 Fighter Jet : इराकी सरकार लवकरच पाकिस्तान सरकारकडून 12 जेएफ-17 थंडर ब्लॉक-3 लढाऊ विमाने खरेदी करणार असल्याच्या बातम्या पाकिस्तानकडून आल्या होत्या. यासाठी 66.4 मिलियन डॉलरची किंमत सांगितली जात होती. पण आता इराकच्या हवाई दलाने जेएफ-17 थंडर या लढाऊ विमानाच्या खरेदीत इराक सहभागी नसल्याचं म्हटलं आहे. इराकी हवाई दलाच्या सूत्रांनी सांगितले की, अशी विमाने खरेदी करण्याची कोणतीही योजना, कोणतीही चर्चा, आणि निश्चितपणे कोणताही करार झालेला नाही.

scrapped JF-17 fighter jet
Chandrayan-3 : चांद्रयान चंद्रावर उतरवण्याची जबाबदारी घेणाऱ्या रितू करिधल कोण आहेत?

अरेबियन बिझनेसने आपल्या अहवालात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, ही बातमी गेल्या वर्षीची आहे. त्यावेळी संरक्षण मंत्री झुमा इनाद यांचा कार्यकाळ होता. परंतु तो 27 ऑक्टोबर 2022 रोजी संपला आहे. इराकी हवाई दलाच्या सूत्राने सांगितले की, "संरक्षण मंत्री थाबित अल अब्बासी JF-17 ची खरेदी करणार नाहीत. मीडिया रिपोर्ट्समध्ये असं म्हटलंय की, इराकने जेएफ-17 ब्लॉक-3 साठी पाकिस्तानी कंपनीशी करार केला आहे. जेटच्या विक्रीसाठी दोन वर्षांपासून वाटाघाटी सुरू होत्या.

राफेलवरही हवाई दलाची नजर

फोर्ब्सने आपल्या अहवालात असेही म्हटले आहे की इराकी वायुसेना JF-17 किंवा राफेल लढाऊ विमाने खरेदी करू शकते. सप्टेंबर 2021 मध्ये, पाकिस्तानच्या द नेशन वृत्तपत्राने आपल्या अहवालात प्रथम पाकिस्तान आणि इराक यांच्यातील कराराचा दावा केला होता.

scrapped JF-17 fighter jet
Chandrayan 3 Date: तारीख ठरली! 'या' दिवशी अवकाशात झेपावणार चांद्रयान, ISRO सज्ज

अलीकडे इराकी मीडियाने दिलेल्या बातम्यांप्रमाणे, इराक अजूनही 14 राफेल विमाने खरेदी करण्यास इच्छुक आहे आणि 2021 पासून चर्चा सुरू आहे. सशस्त्र दलाच्या कमांडर-इन-चीफचे प्रवक्ते मेजर जनरल येहिया रसूल यांचा हवाला देऊन या बातम्या देण्यात आल्या होत्या.

scrapped JF-17 fighter jet
Chandrayan 3: चांद्रयान 3 मोहिमेसाठी ISRO सज्ज; पुढील महिन्यात 'या' तारखेला होणार लॉन्च?

चीन-पाकिस्तानने मिळून तयार केले JF-17

फ्रान्ससह अनेक देशांकडून आधुनिक लष्करी उपकरणे खरेदी करता येतील, असेही रसूल म्हणाले. तसेच इराक एकापेक्षा जास्त देशांकडून लढाऊ विमाने खरेदी करू शकतो, असे संकेत दिले होते. JF-17 फायटर जेटची निर्मिती चीन आणि पाकिस्तानने संयुक्तपणे केली आहे. पाकिस्तानने आपले JF-17 नायजेरियाला विकले आहे. आता पुढे ते हे जेट मलेशिया, अझरबैजान आणि म्यानमारला विकण्याची शक्यता आहे का याची चाचपणी सुरू आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com