Child Abuse Case in Palakkad
esakal
पलक्कड : उत्तर केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील कांजीकोडजवळ गेल्या आठवड्यात एक धक्कादायक घटना (Child Abuse Case in Palakkad) घडली आहे. पाच वर्षांच्या चिमुकलीने झोपेत पलंगावर लघवी केल्याच्या कारणावरून तिच्या सावत्र आईने तिच्या गुप्तांगाला गरम स्टीलच्या पळीने चटका देत अमानुष शिक्षा दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.