Police Awareness: ‘पोक्सो’पासून ‘डायल ११२’पर्यंत; ग्रामीण आणि नक्षलग्रस्त भागातील मुलींना कायद्याची माहिती देणार पोलीस

Palamu Police Awareness, POCSO Law, Dial 112 — झारखंडमधील पलामू पोलिसांनी ग्रामीण आणि नक्षलग्रस्त भागातील शाळा, महाविद्यालये व कोचिंग संस्थांमध्ये मुलींसाठी विशेष जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
good touch bad touch training by police.

good touch bad touch training by police.

esakal

Updated on: 

झारखंड: महिला आणि शाळकरी मुलींच्या सुरक्षेबरोबरच त्यांना त्यांच्या कायदेशीर अधिकारांची माहिती मिळावी, यासाठी झारखंडमधील पलामू पोलिसांनी विशेष जनजागृती मोहीम सुरू केली आहे. शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग संस्थांमध्ये जाऊन महिला पोलीस अधिकारी आणि बीट अंमलदार मुलींशी थेट संवाद साधत आहेत. या मोहिमेत ‘गुड टच-बॅड टच’, पोक्सो कायदा, छेडछाडविरोधी उपाय आणि आपत्कालीन मदत याबाबत माहिती दिली जात आहे.

पलामूचे पोलीस अधीक्षक कपिल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. पलामू पोलिसांच्या अधिकृत माहितीनुसार, जिल्ह्यात २८ पोलीस ठाणी आणि महिला पोलीस ठाणेही कार्यरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com