

A special Tiger Cell has been established at Palamu Tiger Reserve to strengthen tiger conservation.
esakal
झारखंड: झारखंडमधील एकमेव व्याघ्र प्रकल्प असलेल्या पलामू व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या संवर्धनासाठी विशेष ‘टायगर सेल’ स्थापन करण्यात आला आहे. या पथकात विविध क्षेत्रांतील १० तज्ज्ञांचा समावेश असून, वाघांच्या हालचालींवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने लक्ष ठेवणे, त्यांच्या अधिवासाचा अभ्यास करणे आणि संवर्धनाच्या उपाययोजनांना गती देणे ही या सेलची प्रमुख उद्दिष्टे आहेत. बेतला राष्ट्रीय उद्यानात या सेलचे मुख्यालय असेल. प्रकल्पाच्या बफर क्षेत्राचे उपसंचालक प्रजेश कान्त जेना यांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करणार आहे.