पांचजन्य अमृतमहोत्सव; उत्तर प्रदेश हे देशातील क्रमांक १ ची अर्थव्यवस्था; योगी आदित्यनाथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchjanya Amritmahotsav Yogi Adityanath statement Uttar Pradesh no 1 economy in country

पांचजन्य अमृतमहोत्सव; उत्तर प्रदेश हे देशातील क्रमांक १ ची अर्थव्यवस्था; योगी आदित्यनाथ

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश हे देशातील क्रमांक १ ची अर्थव्यवस्था बनण्याच्या दृष्टीने अत्यंत वेगाने अग्रेसर असल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. संघाच्या पांचजन्य मुखपत्राच्या अमृतमहोत्सवानिमित्त झालेल्या विशेष कार्यक्रमात बोलताना आदित्यनाथ यांनी हा दावा केला. त्याचबरोबर काशी विश्वनाथ, विंध्यवासिनी धाम आदी ७०० धार्मिक स्थळांच्या ‘जीर्वोध्दारा‘ची योजनाही वेगाने सुरू आहे असेही सूचक विधान आदित्यनाथ यांनी केले. यानिमित्त झालेल्या माध्यम महासंमेलनात आदित्यनाथ यांनी व्हर्चयुअल माध्यमातून संबोथित केले.

मनोहरलाल खट्टर (हरियाणा) हेमंत विस्वा सरमा (आसाम), प्रमोद सावंत (गोवा), जयराम ठाकूर (हिमाचल प्रदेश), पुष्कर धामी (उत्तराखंड) आदी मुख्यमंत्र्यांनही संमेलनाला हजेरी लावली. पांचजन्यचे संपादक हितेश शंकर, आॅर्गनायजरचे संपादक प्रफुल्ल केतकर , खासदार रमेश बिधुडी, डॉ. विनय सहस्त्रबुध्दे आदी उपस्थित होते. दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी संपादकपद भूषविलेल्या पांचजन्यशी आपले विद्यार्थी दशेपासून घट्ट नाते असल्याचे सांगून आदित्यनाथ म्हणाले की भारताच्यया संस्कृती व सभ्यतेवर होणारा प्रत्येक हल्ला परतवून लावण्यासाठी पांचजन्यने कायम सकारात्मक उर्जा दिली आहे.

उत्तर प्रदेशात २०१२ ते २०१७ पासून ७०० हून जास्त दंगली झाल्या पण गेल्या ६ वर्षांत एकही दंगल झाली नाही. ‘डबल इंजिन'सरकारच्या कामकाजामुळे गेल्या ७० वर्षांत राज्यात गुंतवणुक झालेली आहे. या सरकारने चार डझनांहून जास्त विकास योजना मार्गी लावल्या आहेत. सर्वाधिक एक्र्पेस वे असलेले, प्रती व्यक्ती उत्पन्न दुपटीने वाढलेले, पाच पाच आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेले उत्तर प्रदेश आर्थिक बाबतीतही देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनण्याच्या दिशेने अग्रेसर आहे. मुख्यमंत्री तीर्थस्थळ विकास योजनेत काशी विश्‍वनाथ, ब्रज तीर्थ विकास, देवी विंध्‍यवासिनी ग्राम, नमामि गंगे परियोजना आदींच्या माध्यमातून ७०० हून जास्त तीर्थक्षेत्रांचा जीर्णोध्दार करण्याचे काम वेगाने सुरू आहे असेही आदित्यनाथ म्हणाले.

निवेदिता वैशंपायन यांना राष्ट्रीय पत्रकार पुरस्कार

पांचजन्यच्या नावाने यंदापासून राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार सुरू करण्यात आले त्यांचेही वितरण यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रत्येकी ५१ व ७५ हजार रूपये रोख, सन्मानपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. सर्वोत्तम प्रादेशिक पत्रकारितेचा पुरस्कार मराठीसाठी दिल्लीतील मुक्त पत्रकार निवेदिता मदाने-वैशंपायन यांना मिळाला. याशिवाय सर्वश्री आनंद रंगनाथन, अशोक श्रीवास्तव, निमिष व रिशांत राघव, स्वाती गोयल शर्मा, बालेंदू दधीच, रवीश तिवारी आदींनाही विविध श्रेणींतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

Web Title: Panchjanya Amritmahotsav Yogi Adityanath Statement Uttar Pradesh No 1 Economy In Country

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top