बेळगाव : पंढरपूर यात्रेसाठी (Pandharpur Ashadhi Wari) गेलेल्या बेळगाव तालुक्यातील अलतगा गावातील तरुणाचा चंद्रभागेत (Chandrabhaga River) बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २०) सकाळी सातच्या सुमारास घडली. शुभम ज्ञानेश्वर पावले (वय २७, रा. तानाजी गल्ली, अलतगा, जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे.