

Pandit Raja ki Thandai
esakal
उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा उत्तर प्रदेशात उष्णतेची लाट असते, तेव्हा शरीराला थंडावा देण्यासाठी 'ठंडाई'सारखा दुसरा उत्तम पर्याय नाही. त्यातही जर आपण उत्तर प्रदेशातील सर्वात प्रसिद्ध ठंडाईबद्दल बोललो, तर लखनौच्या 'पंडित राजा की ठंडाई' (Pandit Raja ki Thandai) या दुकानाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ९० वर्षांचा इतिहास आणि ५ पिढ्यांचा वारसा जपणाऱ्या या ठिकाणाची चव आजही अजोड आहे.