Law News: 2 पेक्षा जास्त मुलं असलेल्यांना सरकारी नोकरी नकोच; सुप्रीम कोर्ट नेमकं काय म्हणाले?

government jobs What Supreme Court said: २१ वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टाने पंचायत निवडणुकीमध्ये दोन पेक्षा जास्त मुल असणाऱ्या उमेदवारांना निवडणूक न लढवण्याच्या निर्णय दिला होता.
hammer
hammeresakal

नवी दिल्ली- राजस्थानमध्ये पंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना जास्तीत जास्त दोन मुल असण्याचे धोरण आहे याशिवाय आता सरकारी नोकऱ्यांमध्ये देखील कमाल दोन मुलं असण्याचे धोरण अनिवार्य करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाने आधीच्याच निर्णायावर शिक्कामोर्तब केले आहे. (Parents with more than 2 children should not have government jobs! Know What Supreme Court said)

दोन पेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना आता सरकारी नोकरी करता येणार नाही. २१ वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टाने पंचायत निवडणुकीमध्ये दोन पेक्षा जास्त मुल असणाऱ्या उमेदवारांना निवडणूक न लढवण्याच्या निर्णय दिला होता. कोर्टाने असं म्हणत याचिका फेटाळली की, याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची गरज नाही.

hammer
Pre Marital Disease Divorce: पत्नीचा डावा डोळा गाढ झोपेतही उघडा, घटस्फोटासाठी पतीची न्यायालयात धाव, कोर्ट म्हणालं....

माजी सैनिक राम लाल जाट हे २०१७ मध्ये निवृत्त झाले होते. २५ मे २०१८ रोजी त्यांनी राजस्थान पोलीसमध्ये एका पदासाठी अर्ज केला होता. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या पीठाने याचिका फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती केवी विश्वनाथन यांनी याप्रकरणी सुनावणी घेतली होती.

राजस्थानच्या विभिन्न सेवा, २००१ नुसार, १ जून २००२ किंवा त्यानंतर उमेदवाराला दोनपेक्षा जास्त मुल असल्यास सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरवण्यात येते. राम लाल जाट यांना दोन पेक्षा अधिक मुलं आहेत. त्यांनी याआधी राजस्थान हायकोर्टात सरकारच्या निर्णयाला आव्हान दिले होते. २०२२ मध्ये हायकोर्टाने याप्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता.

hammer
''जज साहेब मी जिवंत आहे'', स्वतःच्याच हत्या प्रकरणात चिमुकल्याची साक्ष; कोर्ट अचंबित

पंचायत निवडणुका लढण्यासाठी जे नियम आहेत. त्याच प्रकारचे नियम सरकारी नोकरीसाठी आहेत. सुप्रीम कोर्टाने २००३ मध्ये जावेद विरुद्ध हरियाणा राज्य सरकार प्रकरणात निर्णय दिला होता. यात दोनपेक्षा अधिक मुल असल्यास उमेदवाराला अपात्र घोषित करण्यात आले होते. कुटुंब नियोजनासाठी हे आवश्यक आहे असं कोर्टाचं मत होतं. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com