Arvind Kejriwal: 'ब्रश सोबत घ्यायला विसरू नका..'; केजरीवालांच्या तुरुंगात जाण्यावर 'बाबू भैय्या'ने केला हल्लाबोल

Arvind Kejriwal: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज आत्मसमर्पण करणार आहे. त्यापूर्वी 'बाबू भैय्या' या नावाने प्रसिद्ध असलेले बॉलिवूड अभिनेते आणि भाजप नेते परेश रावल यांनी खरपूस समाचार घेतला आहे. त्यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना तुरुंगात जाताना ब्रश घेऊन जाण्यास सांगितले आहे.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalEsakal

आम आदमी पार्टीचे (AAP) प्रवर्तक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 2 जून रोजी तिहार तुरुंगात जावं लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून 21 दिवसांचा दिलासा मिळाल्यानंतर आज (रविवार) त्यांनी शरणागती पत्करावी लागणार आहे. तुरुंगात जाण्यापूर्वी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. मात्र आता बॉलिवूड अभिनेता आणि 'बाबू भैया' या नावाने प्रसिद्ध असलेले भाजप नेते परेश रावल यांनी अरविंद केजरीवाल यांचा समाचार घेतला आहे. त्यांनी सीएम केजरीवाल यांना तुरुंगात जाताना खोचकपणे ब्रश सोबत नेण्यास सांगितले आहे.

ब्रश न्यायला विसरू नका

भाजप नेते परेश रावल यांनी ट्विटरवर लिहिले, 'अरविंद जी, आशा आहे की तुम्ही तुमची बॅग पॅक केली असेल? टूथब्रश घ्यायला विसरू नका कारण तुमचे तोंड स्वच्छ ठेवणे खूप महत्वाचे आहे!' परेश रावल यांनी हेरा-फेरी आणि फिर-हेरा-फेरी या चित्रपटात बाबू भैय्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटांना रिलीज होऊन बरीच वर्षे झाली असली तरी 'बाबू भैय्या'च्या व्यक्तिरेखेशी संबंधित मीम्स अनेकदा व्हायरल होतात.

Arvind Kejriwal
Mandi Constituency Lok Sabha Election Result: कंगना की विक्रमादित्य सिंह? मंडीत कोण मारणार बाजी? ‘टिक्का साहेब’ अन् क्वीनमध्ये काटे की टक्कर

दुपारी केजरीवाल तिहारमध्ये जाणार

मुख्यमंत्री केजरीवाल दुपारी तिहार तुरुंगाकडे रवाना होतील. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, 'माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मी 21 दिवस निवडणूक प्रचारासाठी बाहेर पडलो. माननीय सर्वोच्च न्यायालयाचे खूप खूप आभार. आज मी तिहारमध्ये आत्मसमर्पण करेन. मी दुपारी ३ वाजता घरून निघेन. सर्वप्रथम मी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहणार आहे.तेथून मी हनुमानजींचा आशीर्वाद घेण्यासाठी कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात जाईन. आणि तेथून मी पक्ष कार्यालयात जाऊन सर्व कार्यकर्त्यांची आणि पक्षाच्या नेत्यांची भेट घेणार आहे. तेथून मी पुन्हा तिहारला जाईन.

Arvind Kejriwal
Rahul Gandhi on Exit Poll: "सिद्धू मुसेवालाचं गाणं ऐकलंय का?..."; राहुल गांधींची एक्झिट पोलवर पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?

निवडणूक प्रचारासाठी तीन आठवड्यांचा तात्पुरता जामीन संपल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रविवारी तिहार तुरुंगात परत जावे लागणार आहे. कारण वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामीन मागणाऱ्या त्याच्या याचिकेवर न्यायालयाने आपला आदेश ५ जूनपर्यंत पुढे ढकलला आहे.

केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी 10 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामिनावर 1 जूनपर्यंत तुरुंगातून मुक्त केले होते. कथित अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मंजूर अंतरिम जामीन सात दिवसांनी वाढवावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने बुधवारी त्यांची याचिका तातडीने सूचीबद्ध करण्यास नकार दिला.या याचिकेत केजरीवाल यांनी आपले वजन कमी होत असल्याने आणि कीटोनचे प्रमाण जास्त असल्याने वैद्यकीय चाचणी घेण्यासाठी वेळ हवा, अशी विनंती केली होती.

Arvind Kejriwal
Sikkim Assembly Election: सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने पुन्हा मिळवली सत्ता, विरोधकांचा एकच उमेदवार विजयी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com