
नवी दिल्ली, ता. १० : जॉर्ज सोरोस व गौतम अदानी मुद्द्यावरून सलग दुसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी करून गोंधळ घातल्याने दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
राज्यसभेत कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर दिल्लीतील शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यावरून ‘आप’चे सदस्य संजय सिंह यांनी स्थगन प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळला. यावर बोलताना खासदार संजय सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काय करीत आहे, असा सवाल केला.