'पार्ले जी' कंपनीचा जाहिरातींबाबत मोठा निर्णय; सोशल मीडियावर प्रचंड कौतुक

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 12 October 2020

पोलिसांनी TRP मध्ये फेरफार केल्याप्रकरणी रिपब्लिक टिव्हीसह अनेक चॅनेल्सवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. पोलिसांनी ही माहिती उघड केल्यानंतर TV मिडीयात मोठी खळबळ माजली होती.

मुंबई: पोलिसांनी TRP मध्ये फेरफार केल्याप्रकरणी रिपब्लिक टिव्हीसह अनेक चॅनेल्सवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. पोलिसांनी ही माहिती उघड केल्यानंतर TV मिडीयात मोठी खळबळ माजली होती. आता जाहिरातदार आणि विविध ऍड एजन्सी TV चॅनेल्सवर लक्ष ठेऊन असल्याचे दिसत आहेत.

आता प्रसिध्द बिस्कीट कंपनी पार्ले जीने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे पार्ले जी उग्र कंटेन्ट पसरवणाऱ्या TV चॅनेल्सवर आपल्या ब्रॅंडची जाहिरात करणार नाही असे कंपनीने अधिकृतपणे सांगितले आहे. ही माहिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबई पोलिसांनी टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट्समध्ये फेरफार केल्याप्रकरणी काही चॅनेल्सवर कारवाई केली होती. त्या पार्श्वभूमीवर पार्ले जी कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे. 

कंपनी काय म्हणाली-
समाजात तेढ निर्माण करणारा आणि सामाजिक स्वास्थ बिघडवणाऱ्या TV चॅनल्सला यापुढे पार्ले जी कंपनी जाहिरात देणार नाही, असं कंपनीने सांगितले आहे. आमच्यासोबत इतर कंपन्यांनीही याचे अनुकरण करावे अशी आशाही व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे TV चॅनेल्सला त्यांचा कंन्टेटमध्ये बदल करतील असे कंपनीचे आधिकारी बुध्द यांनी सांगितले आहे.

गुन्हे शाखेच्या तपासानुसार, रिपब्लिक भारत बरोबरच फक्त मराठी आणि बॉक्स ऑफिस हे दोन चॅनेल्ससुद्धा फेक टीआरपी प्रकरणात अडचणित आले आहेत. फक्त मराठी आणि बॉक्स ऑफिस चॅनेलच्या मालकांना मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत मात्र रिपब्लिक चॅनेल्सच्या मॅनेजमेंटची चौकशी करून पुढील कारवाई करणार असल्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग म्हणालेत. मुंबईतील 1800 घरामध्ये पैसे देऊन हे चॅनेल्स चालू ठेवावेत अस सांगण्यात आलं होतं त्यानुसार हा टीआरपी वाढवण्यात हातभार लावण्यात आला. महिन्याला 400 ते 500 रुपये या लोकांना देऊन टीआरपी वाढवण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parle G Company big decision on advertising starts Huge praise on social media