Budget Session 2025 : अधिवेशनात १६ विधेयकांना मंजुरी; लोकसभेची उत्पादकता ११८, तर राज्यसभेची ११९ टक्के
Parliament Session : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण १६ विधेयकांना मंजुरी देण्यात आली असून, लोकसभेची उत्पादकता ११८% आणि राज्यसभेची ११९% इतकी राहिली. बॅंकिंग व वक्फ दुरुस्ती विधेयक यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर संसदेत निर्णय घेण्यात आला.
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाची नुकतीच सांगता झाली. यात एकूण सोळा विधेयके मंजूर झाली. राज्यसभेत सभापती जगदीप धनकड यांनी तर लोकसभेमध्ये अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अनिश्चित काळासाठी कामकाज तहकूब केले.