शत्रू वेळोवेळी बदलत आहे, त्याच्याविरुद्ध सातत्यानं लढा देण्याची गरज; आरोग्य मंत्र्यांचं मोठं विधान I Coronavirus | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health Minister Mansukh Mandaviya

गेल्या 3 वर्षांत व्हायरसच्या बदलत्या स्वरूपामुळं आरोग्याला धोका निर्माण झालाय.

Coronavirus : शत्रू वेळोवेळी बदलत आहे, त्याच्याविरुद्ध सातत्यानं लढा देण्याची गरज; आरोग्य मंत्र्यांचं मोठं विधान

Parliament Winter Session : विरोधकांच्या गदारोळात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Health Minister Mansukh Mandaviya) यांनी देशातील कोरोनाच्या (Corona) स्थितीवर भाष्य केलंय. आरोग्य मंत्री म्हणाले, 'गेल्या 3 वर्षांत व्हायरसच्या बदलत्या स्वरूपामुळं आरोग्याला धोका निर्माण झालाय, त्याचा परिणाम प्रत्येक देशावर होत आहे.'

एका वर्षात भारतात कोविड प्रकरणांमध्ये सातत्यानं घट होत आहे. सध्या दररोज 153 केसेस येत आहेत. जगभरात दररोज 5.87 लाख केसेसची नोंद होत आहे. जपान, दक्षिण कोरिया, अमेरिका, फ्रान्स यांसारख्या देशांमध्ये कोविडमुळं होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढलीये, असं मांडविया यांनी सांगितलं.

हेही वाचा: Lionel Messi : आता अर्जेंटिनाच्या नोटेवर दिसणार 'मेस्सी'; सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

आरोग्य मंत्री पुढं म्हणाले, नवीन प्रकारामुळं आव्हान वाढलंय. प्रत्येक प्रोटोकॉलचं पालन करणं आवश्यक आहे. आम्ही कोविड महामारीचं व्यवस्थापन केलं असून राज्यांनाही मदत केलीये, जेणेकरून ते कोविडविरुद्ध लढू शकतील. 220 कोटी कोविड लस बनवण्यात आल्या आहेत. 90 टक्के लोकसंख्येला दोन्ही लसी मिळाल्या आहेत.

हेही वाचा: Narendra Modi : भारतात पुन्हा Lockdown लागणार? PM मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

आरोग्य मंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

  • आमचं लक्ष जगाकडं आहे. बदलत्या प्रकारामुळं निर्माण होणाऱ्या आव्हानांवर सरकार तातडीनं पावलं उचलत आहे. राज्यांना कोविड नियंत्रित करण्यासाठी जीनोम अनुक्रम वाढवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

  • राज्यांनीही डोस वाढवण्यासाठी आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

  • 'भारत कोरोना चाचणी आणि उपचारांसह लसीकरणावर लक्ष केंद्रित करत आहे. ही महामारी थांबवण्याचा आमचा निर्धार आहे. आवश्यक ती पावलं उचलली जात आहेत.

  • ही महामारी अजूनही पूर्णपणे संपलेली नाहीये. सावधगिरीचा डोस लागू केल्यानंतर कोविड प्रोटोकॉलचं पालन केलं पाहिजे. आपला शत्रू वेळोवेळी बदलत असतो, त्याच्याविरुद्ध सातत्यानं लढा देण्याची गरज आहे.

हेही वाचा: Medicine Price : कॅन्सरसह 'या' आजारांवरची औषधं 40 टक्क्यांनी स्वस्त; जाणून घ्या नव्या किमती

दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज (गुरुवार) कोरोना अलर्टचा परिणाम दिसून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी मास्क घालून संसदेत पोहोचले. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर हेही मास्क घातलेले दिसले. शिवाय, मास्क न घालणारे अनेक खासदारही दिसले.