अखेर कृषी कायदे लोकसभेत रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parliament

अखेर तीन कृषी कायदे लोकसभेत रद्द

संसदेच्या कामकाजाला १२ वाजता पुन्हा सुरुवात करण्यात आली असून, कृषी नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी कायदे मागे घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानंतर लगेचच हे विधेयक रद्द करण्यात आले.लोकसभेत गदारोळ सुरू असतानाच सभापतीओमप बिरला यांनी यावर मतदान घेतलं. सर्वाधिक मतं मागे घेण्यावर आल्याने त्यांनी सरकारच्या मताला सहमती दर्शवली आणि कायदे मागे घेण्यावर शिक्कामोर्तब केलं.

कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी कायदे मागे घेण्याचं विधेयक पटलावर सादर करताच विरोधकांनी मोठा गोंधळ केला. या गोंधळातच हे विधेयक पारित झाले.

अधिवेशनाच्या सुरुवातीलाच आज मोठा गदारोळ झाला. त्यानंतर राज्यसभेचे सभागृह देखील स्थगित करण्यात आले होते. त्यापूर्वी लोकसभेचे सभागृह १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते.

संसदेचे अधिवेशनात पहिल्याच दिवशी झालेल्या गोंधळामुळे कामकाज स्थगित केल्यानंतर काँग्रेसने सरकारच्या विरोधात सभागृहाबाहेर आंदोलन सूरू केलं आहे. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे देखील उपस्थित होते. काँग्रेस आणि तृणमुल काँग्रेसच्या खासदारांनी कृषी कायद्यांच्या मुद्यावरून सरकारविरोधात निदर्शने केली.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज सूरूवात झाली असून, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसाची सुरूवात गदारोळाने झाली. त्यानंतर सभागृहाचे सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज १२ पर्यंत स्थगित केलं आहे. विरोधकांनी गदारोळ सूरू करताच सभापतींनी सर्व खासदारांना संसदेच्या प्रतिष्ठेचा मान ठेवण्याचं आवाहन केलं. मात्र तरी देखील विरोधक शांत होत नसल्याचे पाहता त्यांनी कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. त्या पार्श्वभुमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांशी संवाद साधताना अधिवेशनादरम्यान सर्व खासदारांना गदारोळ न करण्याचं आवाहन केलं होतं. संसदेच्या या अधिवेशनात विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यास आम्ही तयार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे. जगभारत सध्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे भीती निर्माण झाली असून, त्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान मोदींनी देखील सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. यामध्ये त्यांनी आज संसदेत अन्नदात्याच्या नावाचा सुर्य उगवेल असं म्हटलं होतं.

टॅग्स :Parliament Winter Session