
नवी दिल्ली : ‘‘विरोधी पक्ष सुधारणार नाहीत. विरोधक यापुढे चर्चेत सहभाग होवोत अथवा न होवोत. सरकार उभय सदनात महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेईल,’’ असे संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ‘इंडिया’ आघाडीने निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर काढलेल्या मोर्चाचा संदर्भ देत रिजिजू यांनी विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला.