तुटलेल्या करंगळीसह खेळताना पार्थिव काय करायचा माहितेय?

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Wednesday, 9 December 2020

वयाच्या सहाव्या वर्षी पार्थिव पटेलच्या डाव्या हाताची करंगळी दरवाजात अडकल्यामुळं कट झाली होती. या अपघाताचा त्याने आपल्या कारकिर्दीवर परिणाम होऊ दिला नाही.

क्रिकेटच्या मैदानात उतरताना खेळाडूला सर्व बोटे असणे किती महत्त्वाचे आहे, ते खेळ बघणाऱ्यांना आणि हा खेळ कळणाऱ्याला अधिक सांगण्याची गरज नाही. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही स्तरावर उत्तम कामगिरी बजावण्यासाठी हाताची दहा बोटे उत्तम असणे महत्त्वाचे असते. हाताचे एखादे बोट नसताना विकेट किपिंग करण्याची कल्पनाच करता येत नाही. पण पार्थिव पटेलनं ती करुन दाखवली. 

भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करताना युवा विकेट किपरचा विक्रम आपल्या नावे नोंदवणारा पार्थिव पटेलाच्या एका हाताचे बोटच नाही.  हाताच्या 9 बोटावरच तो यष्टीमागील आपली भूमिका चोख पार पाडायचा.  2003 च्या विश्वचषकातही तो संघाचा सदस्य होता. पार्थिव पटेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार प्रभावी ठरला नसला तरी स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने दमदार कामगिरी नोंदवली आहे.  193 लिस्‍ट ए आणि 194 फर्स्‍ट क्‍लास मॅचमध्ये त्याच्या नावे  16 हजारहून अधिक धावा आहेत.  

ICC ने दिला पार्थिव पटेलच्या विश्वविक्रमी आठवणीला उजाळा

वयाच्या सहाव्या वर्षी पार्थिव पटेलच्या डाव्या हाताची करंगळी दरवाजात अडकल्यामुळं कट झाली होती. या अपघाताचा त्याने आपल्या कारकिर्दीवर परिणाम होऊ दिला नाही. हाताचे एक बोट नसताना किपिंग करणे सोपे नव्हते. ग्‍लव्‍ज घालतानाही त्याला अडचणीचे व्हायचे. यावर त्याने तोडगा काढला. त्याने ग्लब्ज फिट बसावा म्हणून त्याने टेप लावण्यास सुरुवात केली. याचा त्याला फायदाही झाला. एका कार्यक्रमात त्याने यासंदर्भात माहिती दिली होती.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: parthiv patel represented india with 9 fingers after losing one