कमी वयात तुम्हाला खूप काही दिलं; काँग्रेसकडून पायलट यांच्यावरील उपकारांचा पाढा 

 The party gave the pilot a lot at a young age said congress
The party gave the pilot a lot at a young age said congress

नवी दिल्ली- राजस्थान काँग्रेसमध्ये आज चांगलीच राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि राजस्थान काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले आहे. त्यांच्यासोबत अन्य तीन मंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याचा निर्णय पक्षाने घेतला. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पायलट यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी पायलट यांना पदावरुन हटवल्याची घोषणा केली आहे. यावेळी सुरजेवाला यांनी पायलट यांच्यावर टीका केली.

उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी झाल्यावर सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया
काँग्रेसने सचिन पायलट यांना कमी वयात जितकी राजनैतिक ताकद दिली, ती अन्य कोणालाही देण्यात आली नाही. 2003 मध्ये पायलट यांनी राजकारणात प्रवेश केला. 2004 मध्ये काँग्रेस पक्षाने त्यांना 26 वर्ष वय असताना संसद सदस्य बनवले. 30 आणि 32 वय असताना पक्षाने त्यांना भारत सरकारमध्ये केंद्रीय मंत्री बनवले. 36 व्या वर्षी त्यांना राजस्थानसारख्या मोठ्या राज्याचा प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आलं. 40 वय असताना त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. 16-17 वर्षाच्या इतक्या कमी कार्यकाळात एखाद्याला इतके प्रोत्साहन देण्याचे एकच कारण होते की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं प्रेम त्यांना मिळत होतं, असं म्हणत सुरजेवाला यांनी पायलट यांना त्यांच्यावर करण्यात आलेल्या उपकारांची जाणीव करुन दिली.

सचिन पायलट आणि काँग्रेसचे काही नेते भाजपच्या षडयंत्राला बळी पडून काँग्रेस सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या 72 तासात सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते सचिन पायलट यांना संपर्क करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. पायलट आणि इतर आमदारांनी परत यावं, त्यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे नेहमी खुले आहेत, मतभेद दूर केले जातील, असं अपिल आम्ही केलं. मात्र, त्यांनी आम्हाला काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आम्हाला कठोर पाऊल उचलावं लागलं असल्याचं सुरजेवाल म्हणाले आहेत.

सचिन पायलट यांनाच दणका; दोन मंत्र्यांसह पदावरुन हकालपट्टी
सचिन पायलट यांच्या जागी गोविंद सिंह दोतासरा यांची राजस्थान काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर जयपूरमध्ये काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत 102 आमदारांनी उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्यासह दोन मंत्र्यांना हटवण्यासंदर्भातील प्रस्ताव मंजुर करण्यात आला होता. दरम्यान, पायलट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. पण, सचिन पायलट यांनी आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचं यापूर्वी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पायलट यांचे पुढील मार्गक्रमण कसे असेल याकडे लक्ष्य असणार आहे. काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातील काँग्रेसचे मोठे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. आता सचिन पायलट हेही बाहेर पडल्याने काँग्रेसची पीछेहाट होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com