

Mamata Banerjee addressing party workers, making strong allegations against BJP over election manipulation.
sakal
कोलकता: ‘‘पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजप फेरफार करण्याचा प्रयत्न करत असून, केंद्रीय सुरक्षा दले आणि निवडणूक निरीक्षक हे भाजपच्या सांगण्यानुसार काम करत आहेत,’’ असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी केला. तसेच “इथे गुंडाराज आहे का?” असा सवाल करत, ‘‘आमचे कार्यकर्ते मरण पत्करण्यासही तयार आहेत, असेही ममता यांनी भवानीपूरमधील चक्रबेऱ्या येथील मतदान केंद्राबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले.