
पश्चिम बंगालमधील निवडणुकीचे वारे आतापासून वाहू लागले आहेत.
कोलकता- पश्चिम बंगालमधील निवडणुकीचे वारे आतापासून वाहू लागले आहेत. भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असतानाच भाजपला मतदान करणाऱ्यांना धमकी देणारा मजकूर लिहिल्याचे नाडिया जिल्ह्यातील एका भिंतीवर आढळून आले आहेत.
``तृणमूल काँग्रेसच्या विरोधात एकही मत दिले गेले तर रक्ताचे पाट वाहतील. भाजपला मत दिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, `` अशी धमकी देणारा मजकूर नाडिया जिल्ह्यात एका भिंतीवर लिहिल्याचे आढळून आले. हा मजकूर कोणी लिहिला हे मात्र कळालेले नाही. भाजपचे जगन्नाथ सरकार हे येथील खासदार आहेत, तर तृणमूल काँग्रेसचे अरिंदम भट्टाचार्य हे आमदार आहे
Farmer Protest : शेतकरी दिनादिवशीच अन्नदाता राहणार उपाशी!
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यात चांगलाच जोर लावला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसचे अनेक बडे नेते भाजपच्या गळाला लागले आहेत. ममतादीदी, निवडणुकीपर्यंत पक्षात तुम्ही एकट्याच राहाल, अशी बोचरी टीका अमित शहांनी शनिवारी सभेत बोलताना केले होती.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसीय पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. शहांनी बोलपूर येथे भव्य असा रोडशो केला. यावेळी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. मी अशा प्रकारचा रोडशो माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही. या रोडशोने पश्चिम बंगालचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींवर किती प्रेम करतात हे दाखवून दिलं आहे. पश्चिम बंगालच्या लोकांना बदल हवा आहे, असं अमित शहा सभेला संबोधित म्हणाले होते.
कोरोना लशीमध्ये डुकराचं मांस? मुस्लिम धर्मगुरुंमध्ये लस टोचून घेण्याबाबत मतभेद
निवडणुकीत ममतांना पायउतार करण्याचा निर्धार भाजपने केला आहे. आणि त्यासाठी भाजप आतापासूनच कंबर कसून कामाला लागली आहे. गृहमंत्री अमित शहा हे पश्चिम बंगालचे दौरे वारंवार करत आहेत. पक्षातील चार आमदारांनी राजीनामा दिल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठे झटके बसले आहेत. 'तृणमूल’चे आमदार शीलभद्र दत्त आणि अल्पसंख्याक गटाचे नेता कबीर उल इस्लाम यांनी शुक्रवारी पक्षाचा राजीनामा दिला. या आधी सुवेंदू अधिकारी आणि जितेंद्र तिवारी हेही ‘टीएमसी’तून बाहेर पडले आहेत. ममतांना एकावर एक बसत असणाऱ्या या झटक्यांचे येत्या निवडणुकीत प्रतिकूल परिणाम होतील, असं बोललं जात आहे.