विमानात प्रवाशाने एअर होस्टेसचे काढले आक्षेपार्ह फोटो; महिला आयोगाने बजावली नोटीस

Flight
Flight
Updated on

नवी दिल्ली : फ्लाइटमध्ये लैंगिक छळाच्या कथित घटनेवरून दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलीस आणि डीजीसीएला नोटीस बजावली आहे. फ्लाइटमधील एका प्रवाशाने कथित लैंगिक छळ केल्याप्रकरणी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओची आयोगाने स्वत:हून दखल घेतली आहे.

Flight
Eknath Shinde : राजीव गांधी जयंतीदिनी मुख्यमंत्री शिंदेंनी नेत्यांना दिली सद्भावना प्रतिज्ञा

व्हायरल व्हिडिओ 16 ऑगस्ट 2023 रोजी दिल्लीहून मुंबईला जाणार्‍या स्पाईसजेटच्या फ्लाइटमधील असल्याचं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणाने फ्लाइटमध्ये एअर होस्टेस आणि महिला सहप्रवाशाचे आक्षेपार्ह फोटो काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या तरुणाचा मोबाईल तपासला असता त्याच्या फोनमधून फ्लाइटमध्ये बसलेल्या महिलांचे आक्षेपार्ह फोटो आढळून आल्याचे सांगण्यात आले.

दिल्ली महिला आयोगाने (DCW) सांगितले की, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक प्रवासी महिला फ्लाइट अटेंडंट आणि महिला सहप्रवाशाचे अश्लील फोटो काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रवाशाचा मोबाईल फोन तपासला असता त्यात विमानातील महिलांची आक्षेपार्ह छायाचित्रे असल्याचे सांगण्यात आले.

DCWच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल म्हणाल्या, “फ्लाइटमध्ये लैंगिक छळाच्या तक्रारी वाढत आहेत. हे अस्वीकार्य आहे. या प्रकरणात एफआयआर नोंदवून दोषींना शिक्षा झाली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com