Ramdev Baba : ''आम्ही माफी मागतो'' दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरुन रामदेव बाबांची सपशेल माघार, स्वतःच कोर्टात पोहोचले

''स्वतः रामदेव बाबा कोर्टात हजर असून ते माफी मागत आहेत. कोर्टाने त्यांच्या माफीची नोंद घ्यावी. आम्ही कोर्टापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत नाहीत.'' असं पतंजलीच्या वकिलांनी म्हटलं.
Ramdev Baba
Ramdev Babaesakal

Ramdev baba patanjali news : दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकरणात पतंजली आयुर्वेद या कंपनीला सुप्रीम कोर्टाने फटकारलं होतं. योगगुरु रामदेव बाबा आणि कंपनीचे एमडी आचार्य बाळकृष्ण यांना कोर्टात हजर राहण्यासाठी कोर्टाने समन्स बजावलं होतं.

मंगळवारी रामदेवबाबा आणि बाळकृष्ण हे दोघेही कोर्टात पोहोचले होते. सुनावणी सुरु झाली त्यावेळी रामदेव बाबांच्या वकिलांनी म्हटलं की, आम्ही अशा जाहिरातींसाठी माफी मागतो. आपल्या आदेशानुसार स्वतः योगगुरु रामदेव बाबा कोर्टात पोहोचले आहेत.

पतंजली आयुर्वेदच्या वकिलांनी पुढे म्हटलं की, स्वतः रामदेव बाबा कोर्टात हजर असून ते माफी मागत आहेत. कोर्टाने त्यांच्या माफीची नोंद घ्यावी. आम्ही कोर्टापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत नाहीत.

Ramdev Baba
Mumbai Fire News: मुंबईत अग्नितांडव! नवभारत इंडस्ट्रियल कंपनीला आग, अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

वकिलांनी पुढे म्हटलं, या प्रकरणासंदर्भात मी काही मजकूर वाचू शकतो का? दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची आमच्या मीडिया प्रमुखांना माहिती नव्हती. त्यामुळे अशी जाहिरात चालली. यावर न्यायमूर्ती अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या कोर्टाने म्हटलं की, तुम्हाला याची माहिती नव्हती, असं समजणं अवघड आहे.

सुप्रीम कोर्टाने २०२३ मध्ये पतंजली या कंपनीला आदेश दिला होता की, त्यांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिराती माघारी घ्याव्यात. जर त्यांनी असं केलं नाही तर आम्हाला कारवाई करावी लागेल. नाहीतर पतंजलीच्या प्रत्येक चुकीच्या जाहिरातींवर एक कोटी रुपयांचा दंड आकारण्यात येईल.

Ramdev Baba
Priyanka Chopra: प्रियांका सांगणार वाघिणीची गोष्ट; देसी गर्लनं ‘टायगर’ ची रिलीज डेट केली जाहीर

न्यायमूर्तींनी रामदेव बाबांचं केलं कौतुक

दरम्यान न्यायमूर्ती अमानुल्ला यांनी रामदेव बाबांचं कौतुकही केलं आहे. रामदेव बाबांनी योगाच्या क्षेत्रात मोठं काम उभं केलं आहे. परंतु त्यांनी अॅलोपथी औषधांवरुन असे दावे करणं चुकीचं आहे.

त्यातच आयएमएच्या वकिलांनी म्हटलं की, त्यांनी त्यांची जाहिरात करावी परंतु अॅलोपथी चिकित्सा पद्धतीवर विनाकारण टीका झाली नाही पाहिजे.

प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी केंद्र सरकारचेही कान खेचले. त्या म्हणाल्या की, केंद्र सरकारने या प्रकरणात आपले डोळे बंद केल्याचं दिसून येतंय, याचं आम्हाला आश्चर्य वाटत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com