Patanjali Medicines Ban : योगगुरू बाबा रामदेवांना मोठा धक्का; पतंजलीच्या 5 औषधांवर बंदी!

योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली ग्रुपला मोठा धक्का बसला आहे.
Ramdev Baba
Ramdev Babaesakal
Summary

योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली ग्रुपला मोठा धक्का बसला आहे.

Patanjali Medicines Ban : योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहातून अनेक प्रकारची औषधं तयार केली जातात. औषधांतून आयुर्वेदिक उत्पादनंही घेतली जातात. मात्र, बाबा रामदेव (Yogguru Baba Ramdev) यांच्या पतंजली ग्रुपला (Patanjali Group) मोठा धक्का बसलाय. पतंजली ग्रुपच्या पाच औषधांचं उत्पादन बंद करण्याचे आदेश उत्तराखंड आयुर्वेद व युनानी परवाना प्राधिकरणानं दिले आहेत.

आयुर्वेद व युनानी परवाना प्राधिकरण उत्तराखंडनं दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचा हवाला देत पतंजलीच्या दिव्या फार्मसीला पाच औषधांचं उत्पादन थांबवण्यास (Patanjali Medicines Ban) सांगितलंय. याबाबत अधिक माहिती अशी की, पतंजली समूहातून तयार करण्यात येत असलेल्या औषधांबाबत केरळचे डॉक्टर के व्ही बाबू यांनी प्राधिकरणाकडं तक्रार दाखल केली होती. त्यानंतर प्राधिकरणाच्या वतीनं औषधांची तपासणी करण्यात आली. या औषधांच्या जाहिरातींवरही आक्षेप घेण्यात आला होता. दिव्य फार्मसीमार्फत या औषधांचं उत्पादन केलं जात होतं.

Ramdev Baba
Pike County Massacre : 2 वर्षाच्या मुलीला मिळवण्यासाठी अख्या कुटुंबाला संपवलं; 8 जणांचा निर्घृण खून

माहिती घेतल्यानांतर प्राधिकरणानं या औषधांचं उत्पादन बंद करण्याचे आदेश पतंजली समूहास देण्यात आले. तर, या औषधांचं पुन्हा उत्पादन करायचं असेल तर त्यासाठी पुन्हा परवागी घेणं बंधनकारक असणार आहे. प्राधिकरणाच्या वतीनं करण्यात आलेली ही कारवाई चुकीची आहे. तसंच आयुर्वेदाला विरोध करणाऱ्यांकडून मुद्दाम केली गेल्याचाही आता आरोप रामदेव बाबा आणि पतंजलीच्या वतीनं करण्यात आला आहे.

Ramdev Baba
Lok Sabha Election : कितीही प्रयत्न केले तरी 2024 मध्ये भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही; ममता बॅनर्जींचा दावा

कोणत्या औषधांवर बंदी?

पतंजली मार्फक मधुग्रीट, थायरोग्रीट, बीपीग्रीट यासोबत लिपिडोम टॅबलेट आणि आयग्रीट गोल्ड, टॅबलेट अशा एकूण पाच औषधांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. बीपी, डायबेटीस याच्यासोबत हाय कोलोस्ट्रॉल यासारख्या आजारांवर ही औषधं प्रभावी असल्याचा दावा केला जात होता. केरळस्थित नेत्रचिकित्सक केव्ही बाबू यांनी यावर्षी जुलैमध्ये या औषधांविरोधात दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं ही कारवाई करण्यात आलीय. याबाबत आम्हाला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचं पतंजलीनं सांगितलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com