पठाणकोटला पुन्हा निशाण्यावर? आर्मी कॅम्पच्या गेटवर ग्रेनेड हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pathankot Blast
पठाणकोटला पुन्हा निशाण्यावर? आर्मी कॅम्पच्या गेटवर ग्रेनेड हल्ला

Pathankot Blast: आर्मी कॅम्पच्या गेटवर ग्रेनेड हल्ला

sakal_logo
By
सुधीर काकडे

पठाणकोट: पंजाबमधील पठाणकोट शहरात असणाऱ्या आर्मी कॅम्पजवळ सोमवारी सकाळी ग्रेनेडचा स्फोट झाला. धिरपुल येथील आर्मी कॅम्पच्या त्रिवेणी गेटवर हा स्फोट झाला. एएनआय या वृत्तसंस्थेने संरक्षण विभागातील सुत्रांच्या माहितीनुसार ही माहिती दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरातून जात असताना बाईकवरून आलेल्या अज्ञात लोकांनी आर्मी स्टेशनच्या गेटजवळ ग्रेनेड फेकले.

हेही वाचा: फेक न्यूजचा बंदोबस्त करण्यासाठी संसदीय समितीकडून केंद्राला प्रस्ताव

पंजाबमधील पठाणकोटमध्ये भारतीय लष्कराचा मोठा तळ आहे. येथे आर्मी कॅम्पच्या त्रिवेणी गेटजवळ स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकून लष्कराचे जवान आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर ग्रेनेडचा स्फोट झाल्याचे समजले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याची तपासणी सुरू आहे. पठाणकोटच्या सर्व पोलीस चौक्यांना अलर्ट करण्यात आले आहे. सूत्रांच्या अहवालानुसार स्थानिक पोलीस यंत्रणेने घटनास्थळी ग्रेनेडचा भाग जप्त केला आहे.

पठाणकोटचे एसएसपी सुरेंद्र लांबा यांनी सांगितले की, रविवारी रात्री उशिरा कॅन्टोन्मेंटच्या त्रिवेणी गेटबाहेर हा स्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पोलिसांनी सांगितले की, मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात लोकांनी कॅन्टोन्मेंटसमोर ग्रेनेड फेकले. सीसीटीव्ही फुटेजवरून त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्फोटानंतर परिसरात अलर्ट जारी करण्यात आल्याचे त्यांनी देखील सांगितले.

loading image
go to top