
पठाणकोट : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या भीषण दुर्घटनेनंतर आता हवाई दलाच्या अपाचे हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग झाल्याचं वृत्त आहे. पंजाबच्या पठाणकोट इथं हे आपात्कालीन लँडिंग झालं आहे. विशेष म्हणजे एअर इंडियाच्या विमानाशी या हेलिकॉप्टरचं कनेक्शन आहे. त्यामुळं एकामागून एक ही दुसरी घटना समोर आल्यानं अनेकांना धडकी भरली.