Nirbhaya Case:'आरोपी दहशतवादी नाहीत' वकिलांच्या युक्तीवादाने फाशीला स्थगिती 

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेल्या चार आरोपींपैकी दोघांनी आज, दिल्लीच्या पटियाला हायकोर्टात पुन्हा फाशीच्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी याचिका दाखल केली होती.

नवी दिल्ली : दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील Nirbhya case  चारही आरोपींना देण्यात येणारी फाशी स्थगित करण्यात आली आहे. पटियाला हाऊस कोर्टाने हा निर्णय दिला असून, पुढील आदेशापर्यंत आरोपींना फाशी न देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. उद्या (1 फेब्रुवारी) सकाळी सहा वाजता चारही आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात येणार होती. तिहार जेलमध्ये या फाशीची संपूर्ण तयारी झाली होती. पण, पटियाला हाऊस कोर्टाच्या निर्णयामुळं आता ही फाशी आता अनिश्चित काळासाठी पुढं ढकलण्यात आलीय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'आरोपी दहशतवादी नाहीत'
दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेल्या चार आरोपींपैकी दोघांनी आज, दिल्लीच्या पटियाला हायकोर्टात पुन्हा फाशीच्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी याचिका दाखल केली होती. या सुनावणीत आरोपींचे वकील ए. पी. सिंह यांनी बाजू मांडली. सिंह यांनी अक्षय ठाकूर, विनय शर्मा आणि पवन गुप्ता यांची बाजू मांडली. त्यावेळी मुकेशसिंहच्या वकील वृंदा ग्रोवर यांनीही त्याची बाजू मांडली. आरोपी हे दहशतवादी नाहीत असा युक्तीवाद ए.पी. सिंह यांनी कोर्टात केला. सिंह यांनी कल 836 चा मुद्दा उपस्थित केला. त्यानुसार जर, एकाचवेळी एक पेक्षा जास्त जणांना फाशीची शिक्षा देण्यात येणार असेल तर, त्या सर्व आरोपींचे कायदेशीर मार्ग संपल्याशिवाय फाशीची अंमलबजावणी करता येत नाही, या युक्तीवादामुळेच फाशीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याचं मानलं जातंय. पवन कुमार गुप्ता याने घटनेच्या वेळी आपण अज्ञानी होतो, असा दावा करत कोर्टात याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने ती फेटाळून लावली. अक्षय ठाकूरची क्युरेटिव्ह याचिका ही फेटाळण्यात आली आहे. आता त्याची दया याचिका दाखल करू, असं सिंह यांनी कोर्टात सांगितलं.

दोषी आरोपींचे वकील ए. पी. सिंह यांनी मला आव्हान दिले आहे की, दोषींना कधीही फाशीची शिक्षा होणार नाही. मी माझा लढा सुरूच ठेवणार आहे. सरकारला फाशीची शिक्षा देण्याविषयी निर्णय घ्यावाच लागेल.
- आशा देवी, पीडित तरुणीची आई


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: patiala house court cancels death warrant delhi Nirbhaya case