पंजाबात लवकरच राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्री म्हणाले..

Amarinder Singh
Amarinder Singhesakal
Summary

कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी मनोहर लाल खट्टर यांच्या चंदीगड येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

काँग्रेसपासून (Congress) फारकत घेत नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा करणारे पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar lal Khattar) यांची भेट घेऊन राजकीय वातावरण निर्माण केलंय. मनोहर लाल खट्टर यांची भेट घेतल्यानंतर अमरिंदर सिंह म्हणाले, आम्ही मित्रपक्षांसोबत लवकरच पंजाबमध्ये सरकार (Punjab Government) स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कॅप्टन अमरिंदर सिंह या भेटीला शिष्टाचार म्हणत असले, तरी भाजपसोबत (BJP) युतीची चर्चाही राजकीय वर्तुळात जोरात रंगलीय.

एएनआयच्या माहितीनुसार, कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी मनोहर लाल खट्टर यांच्या चंदीगड येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर कॅप्टन म्हणाले, मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याशी ही शिष्टाचाराची भेट होती. त्यामुळं कोणीही या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये, असं त्यांनी आवाहन केलंय. मात्र, येत्या काही दिवसांत आम्ही आमच्या मित्रपक्षांसोबत पंजाबमध्ये सरकार स्थापन करणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याआधी काँग्रेसनं अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्री बनवलं होतं. यानंतर अमरिंदर यांनी अपमानाचे कारण देत पक्षाचा राजीनामा दिला होता.

Amarinder Singh
भाजपकडून तृणमूलसह डाव्यांचा सुपडासाफ; त्रिपुरात मिळवल्या 334 पैकी 329 जागा

यावर्षी माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे पटियालामधून विधानसभा निवडणूक (Assembly Election) लढवणार आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय, की मी पटियालामधून (Patiala) निवडणूक लढवणार आहे. पटियाला गेल्या ४०० वर्षांपासून आमच्यासोबत आहे. पटियाला हा नेहमीच कॅप्टन कुटुंबाचा बालेकिल्ला राहिलाय. ते स्वतः या जागेवरून चार वेळा निवडणूक जिंकले आहेत. याशिवाय त्यांची पत्नी परनीत कौर यांनीही येथून 2017 च्या निवडणुकीत विजय मिळवला होता. या वर्षी एप्रिलमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी नवज्योत सिंग सिध्दू यांना पटियालामधून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले होते.

Amarinder Singh
बुरुज अबाधित ठेवून प्रतिष्ठेचा गड जिंकणं NCP, BJP, काँग्रेसमोर मोठं आव्हान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com