भाजप प्रवेश करण्यापूर्वी हार्दिकचं नवं ट्विट; म्हणाला, मी मोदींचा सैनिक म्हणून काम करेन | Hardik Patel News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hardik Patel Marathi News

पाटीदार नेता हार्दिक पटेल आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

भाजप प्रवेश करण्यापूर्वी हार्दिकचं नवं ट्विट; म्हणाला, मी मोदींचा..

नवी दिल्ली : गुजरातचा पाटीदार नेता हार्दिक पटेल (Hardik Patel News) आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहे. भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्यापूर्वी हार्दिक पटेलनं एक ट्विट केलंय. हार्दिक पटेलनं ट्विट करून लहान सैनिक म्हणून काम करणार असल्याचं सांगितलंय. हार्दिकनं गेल्या महिन्यात काँग्रेसच्या (Congress) प्रदेश कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.(Hardik Patel News)

आज (गुरुवार) सकाळी केलेल्या एका ट्विटमध्ये हार्दिकनं म्हटलंय, 'राष्ट्रहित, राज्यहित, जनहित आणि सामाजिक हित या भावनांसह मी आजपासून एका नव्या अध्यायाची सुरुवात करणार आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली देशसेवेच्या कार्यात मी एक लहान सैनिक म्हणूनही काम करेन.'

हेही वाचा: अमेरिका हादरलं : हॉस्पिटलच्या आवारात तरुणाचा गोळीबार, शूटरसह 4 जणांचा मृत्यू

हार्दिक पटेल आगामी विधानसभा निवडणूक लढवणार

हार्दिक पटेल आगामी विधानसभा निवडणूक (Assembly Election) लढवणार असल्याचं सांगण्यात येतंय. हार्दिक सौराष्ट्रातील मोरबी किंवा अहमदाबाद जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावामधील विरमगाम मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो. त्यानं भाजपकडून निवडणूक लढवण्याचे संकेतही दिले आहेत.

हेही वाचा: 7 फेऱ्यांपासून हनिमूनपर्यंत.. पण, लग्नात असणार नाही 'वर'; 'ही' वधू करणार स्वतःशीच लग्न

हार्दिकची काँग्रेसला सोडचिठ्ठी

हार्दिक पटेलनं 18 मे रोजी गुजरात काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाचा, तसेच प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना हार्दिक म्हणाला होता, मला खात्री आहे की, माझ्या निर्णयाचं माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. मला विश्वास आहे की, माझ्या या पावलानंतर मी भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन, असं त्यानं नमूद केलं होतं.

Web Title: Patidar Leader Hardik Patel Tweets Before Joining Bjp In Gujarat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top