
अजित सिंह यांचा जेडीयूमध्ये प्रवेश होणं हा आरजेडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
JDU चा RJD ला दुहेरी झटका; प्रदेशाध्यक्षांच्या मुलाचा पक्षात जाहीर प्रवेश
पाटणा : जनता दल युनायटेडनं (JDU) राष्ट्रीय जनता दलाला (RJD) एकापाठोपाठ दोन धक्के दिले आहेत. जेडीयूनं सर्वप्रथम नवाडा येथून अपक्ष आमदार अशोक यादव यांना पक्षात प्रवेश दिला. त्यानंतर त्याचवेळी जेडीयूनं आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह (Jagdanand Singh) यांचे पुत्र अजित सिंह यांचा पक्षात समावेश करून आरजेडीला दुसरा धक्का दिला. आज (मंगळवार) जेडीयूमध्ये प्रवेश करताना जगदानंद सिंह यांच्या मुलानं आरजेडीवर जोरदार हल्लाबोल केलाय. यावेळी जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह (Lalan Singh) यांनीही आरजेडीवर निशाणा साधताना जगदानंद सिंग यांना जेडीयूत येण्याची ऑफर दिलीय.
जगदानंद सिंह यांचा मुलगा अजित सिंह (Ajit Singh) हा फारसा ओळखीचा नाहीय. मात्र, त्यांना जेडीयूमध्ये सामावून घेण्यासाठी ललन सिंह यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते जेडीयू कार्यालयात पोहोचले होते. जगदानंद सिंह यांच्या मुलाचा जेडीयूमध्ये समावेश करण्यामागं पक्षाला आरजेडीला मानसिक धक्का द्यायचा आहे, हे यावरून स्पष्ट झालंय. जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाह यांनी आरजेडीवर हल्लाबोल करत अजित सिंह यांचा जेडीयूमध्ये प्रवेश महत्त्वाचा असल्याचं म्हंटलंय.
हेही वाचा: Congress : निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेत्याला 'सर्वोच्च' दिलासा
राजद हा पैसा असलेला पक्ष आहे. या पक्षानं माझ्या वडिलांसह अनेक ज्येष्ठ नेत्यांचा अपमान केलाय. अजित सिंह यांनी राजद हा सवर्णविरोधी पक्ष असल्याचाही आरोप केलाय. अजित यांनी आरजेडीवर विशेषतः तेजस्वी यादव यांच्यावर गंभीर आरोप करत पक्ष सोडलाय. यापूर्वी दिवंगत रघुवंश सिंह यांचा मुलगाही जेडीयूमध्ये दाखल झाला आहे. आता जगदानंद सिंह यांचा मुलगा अजित सिंह यांचा जेडीयूमध्ये प्रवेश होणं हा आरजेडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
हेही वाचा: मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या सुरक्षेत मोठी चूक; 15 फूट अंतरावर झाला स्फोट
Web Title: Patna Bihar Politics Rjd State President Jagdanand Singh Son Ajit Singh Has Joined Jdu
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..