

पाटणा : ‘‘मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे आरोग्य आणि मागील २० वर्षांत राज्यातील एनडीए सरकारच्या काळातील बिहारची आर्थिक स्थिती ही चिंतेची बाब असून, त्यामुळे राज्यात सत्ताबदल होणे गरजेचे आहे,’’ असे मत काँग्रेसच्या वतीने रविवारी व्यक्त करण्यात आले. काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी यावेळी ‘सरकार बदलो बिहार बदलो’ असा नारा दिला.