आता Paytm वर बुक करा लस; जाणून घ्या प्रक्रिया

Corona Vaccination
Corona VaccinationSakal

नवी दिल्ली : देशातीत कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. आठवडाभरापासून देशात एक लाखांपेक्षा कमी नवीन रुग्ण आढळत आहेत. महामारीवर मात करण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात लसीकरणही सुरु आहे. लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करुन स्लॉट बुक करु शकता. देशातील सर्वात मोठ्या डिजिटल पेमेंट अ‍ॅप पेटीएमने लसीकरणासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. पेटीएमद्वारे आता युजर्स आता लसीकरणासाठी उपलब्ध स्लॉट शोधण्याबरोबरच लसीकरणासाठी स्लॉटही बुक करु शकतात. आधी पेटीएमवर आपल्या भागात लसीकरणसाठी नवीन स्लॉट उपलब्ध झाल्यास युजर्सला अलर्ट देत होतं. आता पेटीएम युजर्स लसीकरणासाठी स्लॉटही बुक करु शकतात.

पेटीएम युजर्स आता पेटीएम अॅपच्या मदतीनं जवळील केंद्रात लसीकरणासाठी स्लॉट बुक करु शकतात. या सुविधामुळे भारतीयांना कोरोना लस मिळवण्यास मदत होऊ शकते. यामुळे कोरोना महामारीच्या विरोधात लढण्यासाठी भारतीयांना बळ मिळेल, असं पेटीएम कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. कोविन अॅपचे प्रमुख आर एस शर्मा यांनी म्हणाले होते की, पेटीएम, मेकमायट्रिप आणि इन्फोसिस यासारख्या प्रमुखे डिजिटल कंपन्या लसीकरण बुक करण्याच्या सुविधेची मंजुरी देण्याची मागणी करत आहेत.

Corona Vaccination
बिहारमध्ये पुतण्याला धक्का; काकाची पक्षाच्या नेतेपदी निवड

पेटीएम अॅपवर लसीकरण केंद्राची माहिती आणि स्लॉटबाबतची माहिती देण्यात आली आहे. पेटीएम अॅपवर कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लस उपलब्ध आहेत. Paytm Vaccine Slot Finder या अंतर्गत पेटीएमवर लस बुक करु शकतो. कोविन पोर्टलनंतर लस बुक करण्याची सुविधा फक्त पेटीएम अॅपवरच आहे. पाहूयात पेटीएमद्वारे लस कशी बुक करु शकता...

  • पेटीएम अॅपवर Paytm Vaccine Slot Finder या अंतर्गत कोरोना लसीसाठी अपॉइंटमेंट घेऊ शकता.

  • पिनकोडच्या आधारे जवळील लसीकरण केंद्र निवडा.

  • त्याच्यानंतर वय ग्रुप निवडा (18 ते 44, 45+ असे दोन ग्रुप असतील)

  • पहिला डोस की दुसरा डोस पर्यायापैकी एकाची निवड करा.

  • तुमच्या सवडीनुसार वेळेचा स्लॉट निवडा.

  • तुम्हाला हवा असलेला स्लॉट उपलब्ध नसल्यास तर उपलब्ध झाल्यानंतर अॅपद्वारे नोटिफिकेशन मिळेल.

Corona Vaccination
अनलॉक होत असताना आढळला कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ विषाणू

दरम्यान, महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा, प. बंगाल आणि कर्नाटक या राज्यात लॉकडाउन शिथील करण्यास सुरुवात झाली आहे. तर काही राज्यातील परिस्थिती आटोक्यात न आल्यामुळे लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. लागोपाठ आठ दिवसांपासून नवीन कोरोना रुग्णांची संख्या एक लाखांच्या खाली आढळली आहे. अशा परिस्थिती देशात कोरोना हळूहळू आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. 21 जूनपासून राज्यात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com