धर्मनिरपेक्षतेवर 'बुलडोझर' चालवून भाजप देशात अनेक 'मिनी पाकिस्तान' बनवतंय; महबूबा मुफ्तींचा गंभीर आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mehbooba Mufti

'भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे.'

'धर्मनिरपेक्षतेवर बुलडोझर चालवून भाजप देशात अनेक मिनी पाकिस्तान बनवतंय'

सध्या देशभरात हिंदू-मुस्लिम वाद उफाळून आलाय. त्यातच आता हनुमान चालिसा (Hanuman Chalisa), मशिद भोंगे यांसारखे मुद्देही चांगलेच गाजत आहेत. याच पार्श्वभूमीवर जम्मू-कश्मीरच्या (Jammu and Kashmir) माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या (पीडीपी) नेत्या महबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय.

देशातील धर्मनिरपक्षतेवर बुलडोझर चालवून भाजप (BJP) देशात अनेक मिनी पाकिस्तान बनवत आहे, असा आरोप महबूबा मुफ्ती यांनी केलाय. भारतीय जनता पक्षाचे सरकार फक्त अल्पसंख्याकांच्या घरावरच नाही, तर देशातील धर्मनिरपेक्षा संस्कृतीवर बुलडोझर चालवत आहे. केंद्र सरकार (Central Government) प्रत्येक मुद्द्यावर सपशेल अपयशी ठरले असून रोजगार, बुडती अर्थव्यवस्था या समस्येवरून लक्ष भरकटवण्यासाठी हिंदू-मुसलमान विभाजनाचा उपयोग करत आहे, असा घणाघातही त्यांनी केलाय.

हेही वाचा: ईद मुबारक! जगभरात कशी साजरी झाली ईद? पाहा सुंदर फोटो

मुफ्ती पुढं म्हणाल्या, केंद्र सरकार भारतामध्येच अनेक मिनी पाकिस्तान बनवण्याचा प्रयत्न करत आहे. अल्पसंख्याक लोकांना खुलेआम पाकिस्तानला जाण्याचा सल्ला दिला जातोय, असा आरोप त्यांनी केलाय. तसंच आतापर्यंत सरकारनं देशात काहीही नवीन केलं नाही, उलट समाजामध्ये भेद निर्माण केला आणि धर्मनिरपेक्ष संस्कृतीला गालबोट लावलंय, असंही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी जम्मू-कश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षासोबत 2015-2019 दरम्यान उपभोगलेल्या सत्तेवरही टिपणी केली. तसेच आगामी निवडणुकीत पीडीपी सर्वात मोठा पक्ष असेल. शिवाय, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी नॅशनल कान्फरन्ससह अन्य गटांसोबत आघाडीबाबत चर्चा केली जाईल. भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचंही त्या म्हणाल्या. त्या ‘द प्रिंट’शी बोलत होत्या.

Web Title: Pdp Leader Mehbooba Mufti Criticises Bjp Over Hindu Muslim Dispute

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top