21 डिसेंबर : देशाने अनुभवला वर्षातील सर्वात छोटा दिवस

21 डिसेंबर रोजी देशाची राजधानी दिल्लीमध्ये केवळ 10 तासच सूर्यप्रकाश अनुभवता आला.
Dont Fear... Nights Are Lovely...
Dont Fear... Nights Are Lovely...Sakal

पुणे : आज 21 डिसेंबर रोजी देशाची राजधानी दिल्लीमध्ये केवळ 10 तासच सूर्यप्रकाश अनुभवता आला. यामागचे कारण म्हणजे आज 21 डिसेंबर म्हणजेच वर्षातील सर्वात छोटा दिवस आहे. (Winter solstice) त्यामुळे आज इतर दिवसांच्या तुलनेत अंधार लवकर पडला. 21 डिसेंबर हा वर्षातील सर्वात छोटा दिवस असतो. याला विंटर सोलस्टाइस (winter solstice) या नावानेही ओळखले जाते. तर 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. या दिवशी वर्षातील सर्वाधिकवेळ सूर्य दर्शन होते. याशिवाय 21 मार्च आणि 23 सप्टेंबर या दोन्ही दिवशी दिवस आणि रात्रीची वेळ समसमान असते. (The solstice occurs twice a year)

Dont Fear... Nights Are Lovely...
Google Doodle: गुगलचं हिवाळी संक्राती स्पेशल डुडल

सूर्य 21 डिसेंबर या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो. यामुळेच इतर दिवसांपेक्षा 21 डिसेंबर रोजी नेहमीपेक्षा लवकर सूर्यास्त होतो. (longest and shortest day of the year) परिणामी 21 डिसेंबर हा दिवस वर्षाचा सर्वात लहान दिवस असतो आणि रात्र सर्वात मोठी असते. या दिवसाला विंटर सोलस्टाईस असे म्हटले जाते.

याशिवाय 21 डिसेंबर या दिवशी जर्मनी, फ्रान्स आणि इंग्लंड या देशातील काही भागात द फिस्ट ऑप जूल फेस्टिव्हल साजरा केला जातो. याच दिवशी रोमचे नागरिक हा दिवस खास उत्सव म्हणून साजरा करतात. या ठिकाणी या दिवसाला संपन्नता, शेती आणि आपल्या पूर्वजांचा सन्मान या अर्थाने पाहिले जाते. तर चीनमध्ये 21 डिसेंबर हा दिवस पॉझिटीव्ह एनर्जीचा दिवस म्हणून समजला जातो. चीन बरोबरच तैवानमध्ये या दिवशी लोक पारंपरिक अन्न खाण्यास प्राधान्य देतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com