भगवे वस्त्र घालून मंदिरातच करतात बलात्कार : दिग्विजयसिंह

वृत्तसंस्था
Wednesday, 18 September 2019

भगवे वस्त्र परिधान केलेली लोकच मंदिरांमध्ये बलात्कार करतात आणि झाडपाला विकण्याचे काम करतात. मठ-मंदिरांना त्यांनी राजकीय अड्डा बनवून ठेवला आहे.

भोपाळ : सध्या काही जण भगवे वस्त्र परिधान करून मंदिरातच बलात्कार करत आहेत. यांच्यामुळे सनातन धर्म भ्रष्ट होत आहे. देव यांना कधीच माफ करणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी केले आहे.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी सतत चर्चेत राहणाऱ्या दिग्विजयसिंह यांनी यापूर्वीही काँग्रेसला अडचणीत आणले आहे. नुकतेच त्यांनी भाजप आणि बजरंग दल पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयकडून पैसे घेत असल्याचा आरोप केला होता. नुकतेच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही दहशत पसरवत असल्याचा आरोप केला होता.

भोपाळमध्ये बोलताना दिग्विजयसिंह म्हणाले, की भगवे वस्त्र परिधान केलेली लोकच मंदिरांमध्ये बलात्कार करतात आणि झाडपाला विकण्याचे काम करतात. मठ-मंदिरांना त्यांनी राजकीय अड्डा बनवून ठेवला आहे. सनातन धर्माची बदनामी करणाऱ्यांना देव कधीच माफ करणार नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People wearing saffron robes committing rapes inside temples says Digvijaya Singh