
सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये आज परत एकदा वाढ झाली आहे.
नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये आज परत एकदा वाढ झाली आहे. आज डिझेलच्या किंमतीत 24 चे 25 पैशांची वाढ झाली आहे. तर पेट्रोलच्या किंमतीत देखील 22 ते 25 पैशांनी वाढ झाली आहे.
IOCL कडून मिळालेल्या माहितीनुसार आज दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये एक लीटर पेट्रोल आणि डिझेलची किंमत याप्रकारे आहे. खालील भाव प्रति लिटर प्रमाणे आहेत.
आपल्या शहरात काय आहेत भाव?
पेट्रोल-डिझेलच्या किंमती आपण SMS च्या द्वारे देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, आपल्याला RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 नंबर वर SMS पाठवायचा आहे. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा आहे. हा कोड आपल्याला IOCL च्या वेबसाईटवरुन मिळेल.
दररोज सकाळी सहा वाजता बदलतात किंमती
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल होतात. सकाळी सहा वाजल्यापासून नव्या किंमती लागू केल्या जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि इतर गोष्टींसह या पेट्रोलचे भाव जवळपास दुप्पट होतात. परकीय चलनांसहित आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमती काय आहेत या आधारावर दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल होतात.