'पिपल्स फस्ट', पेट्रोल-डिझेल दर कपातीवर PM मोदींचं ट्वीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'पिपल्स फस्ट', पेट्रोल-डिझेल दर कपातीवर PM मोदींचं ट्वीट

आमच्यासाठी लोक नेहमीच प्रथम असतात, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

'पिपल्स फस्ट', पेट्रोल-डिझेल दर कपातीवर PM मोदींचं ट्वीट

नवी दिल्ली : इंधन उत्पादनांच्या सततच्या वाढत्या किमतींमुळं लोकांवर होणारा परिणाम पाहता केंद्र सरकारनं (Central Government) आज (शनिवार) पेट्रोल आणि डिझेलवरील (Petrol and Diesel) उत्पादन शुल्कात मोठी कपात करण्याची घोषणा केलीय. अर्थमंत्र्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 8 रुपये आणि 6 रुपये प्रति लिटरनं कमी करण्याची घोषणा केलीय. यासोबतच उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala Yojana) लाभार्थ्यांना अनुदानही जाहीर करण्यात आलंय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी केलेल्या घोषणेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कौतुक केलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून म्हटलंय, उज्ज्वला योजनेनं करोडो भारतीयांना, विशेषत: महिलांना मदत केलीय. उज्ज्वला योजनेसाठी अनुदान देण्याच्या निर्णयामुळं लाभार्थ्यांचे बजेट मोठ्या प्रमाणात हलकं होणार आहे. आमच्यासाठी लोक नेहमीच प्रथम असतात, असं पंतप्रधान मोदी म्हणाले! आजच्या निर्णयांचा, विशेषत: पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतील लक्षणीय घट, विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करेल. यामुळं आपल्या नागरिकांना दिलासा मिळेल आणि 'जीवन सुलभता' मिळेल, असंही त्यांनी नमूद केलंय.

हेही वाचा: तुम्हाला माहितीय 'त्यावेळी' पेट्रोल चक्क 90 पैसे प्रति लिटर विकलं जायचं!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 8 रुपये आणि 6 रुपये प्रति लिटरनं कमी करण्याची घोषणा केली. यासोबतच त्यांनी घरांमध्ये स्वयंपाक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलिंडरवर 200 रुपये प्रति सिलिंडर सबसिडी देण्याची घोषणा केलीय. त्यामुळं उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरात 12 गॅस सिलिंडरवर हे अनुदान दिलं जाईल.

Web Title: Petrol Diesel Price Reduced Pm Narendra Modi Appreciated The Decision To Reduce Fuel Prices Said People Always First For Us

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top