
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती झपाट्याने वाढल्या आहेत.
Petrol-Diesel Price Hike : सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरात वाढ
Petrol-Diesel Price Today : बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Hike in India) वाढ झालीय. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होताना दिसत आहे. आज पुन्हा एकदा सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 83 पैशांनी वाढ केलीय. राजधानी दिल्लीत (Delhi) आज पेट्रोलचा दर 97.01 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 88.27 रुपये प्रति लिटरवर पोहोचलाय.
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती झपाट्याने वाढल्या आहेत. रशिया आणि युक्रेनमधील जवळपास महिनाभर चाललेल्या युद्धाचा परिणाम जगभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरही झालाय. अशा परिस्थितीत देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होण्याची भीती व्यक्त केली जात होती. 10 मार्चला निकाल लागल्यानंतर 22 मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू लागले आहेत.
हेही वाचा: LPG Price Hike : दूध, पेट्रोल-डिझेलनंतर आता LPG सिलिंडरही झाला महाग
तर, दुसरीकडं देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर 111.67 रुपयांवर पोहोचलाय, तर एक लिटर डिझेल 95.85 रुपयांना विकलं जात आहे. देशातील आणखी एक महानगर कोलकाता इथं पेट्रोल 106.34 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 91.42 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. याशिवाय, चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 102.91 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 92.95 रुपये प्रति लिटर झालाय.
तुमच्या इथं पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत?
शहराचे नाव पेट्रोल डिझेल
दिल्ली 97.01 88.27
मुंबई 111.67 95.85
कोलकाता 106.34 91.42
चेन्नई 102.91 92.95
हेही वाचा: 'किशोरवयात घुसखोरीसाठी सेक्स आणि मोहात पाडण्यास शिकवलं'
केंद्र सरकारनं गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींबाबत जनतेला मोठा दिलासा दिला होता. सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात थेट 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपयांची कपात केली. केंद्राच्या या निर्णयानंतर मध्य प्रदेश, यूपी, बिहारसह जवळपास सर्वच राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटच्या दरात कपात केली होती. त्यानंतर अनेक महिने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले गेले नाहीत.
एलपीजीच्या दरातही वाढ
एलपीजी ग्राहकांनाही आदल्या दिवशी मोठा झटका बसलाय. तेल विपणन कंपन्यांनी एका झटक्यात 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 50 रुपयांनी वाढवलीय. यानंतर बिहारची राजधानी पटनामध्ये एलपीजीची किंमत 1,047.50 रुपयांवर गेली आहे. त्याचप्रमाणं देशातील बहुतांश प्रमुख शहरांमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत 1000 रुपयांच्या जवळपास पोहोचलीय.
हेही वाचा: ..अखेर पेट्रोल-डिझेल दरवाढीनं गाठला मुहूर्त; तब्बल साडेचार महिन्यानंतर इंधन दरवाढ
तुमच्या शहरातील इंधन दर जाणून घ्यायचे आहेत?
आपण एसएमएसद्वारे (SMS) पेट्रोल-डिझेलचे दररोजचे दर जाणून घेऊ शकता (How To Check Diesel Petrol Price Daily). इंडियन ऑईलच्या ग्राहकांना RSP टाईप करुन 9224992249 या मोबाईल क्रमांक आणि बीपीसीएल (BPCL) ग्राहकांनी RSP टाईप करुन 9223112222 क्रमांकावर पाठवावा. तर, एचपीसीएल (HPCL) ग्राहक एचपीप्राइस (HPPrice) टाईप करुन तो 9222201122 या मोबाईल क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतो.
Web Title: Petrol Diesel Price Today Increase 80 Paisa Per Litre 23 March 2022 Second Day Price Hike Delhi Mumbai Kolkata Chennai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..