esakal | ''भारतीय लोकांच्या शोषणाचे सर्वात मोठे उदाहरण, पेट्रोल 90 च्या पार''

बोलून बातमी शोधा

subrahamanian swami.}

पेट्रोलचे दर 90 रुपयांच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संताप वाढत आहे

''भारतीय लोकांच्या शोषणाचे सर्वात मोठे उदाहरण, पेट्रोल 90 च्या पार''
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- पेट्रोलचे दर 90 रुपयांच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संताप वाढत आहे. काँग्रेसच्या काळात पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यानंतर भाजप नेत्यांकडून कठोर टीका करण्यात आली होती. आता भाजप सरकारच्या काळातही पेट्रोल-डिझेलचे दर प्रचंड वाढले आहेत. भाजपच्या काही नेत्यांनी या मुद्द्यावरुन पक्षावर निशाणा साधला आहे. पेट्रोलच्या दरावरुन भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केलंय. त्यांचं हे ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे. 

पेट्रोलचे दर 90 रुपयांचे पुढे गेले आहेत. भारत सरकारकडून भारतीय लोकांच्या शोषणाचे हे सर्वात मोठे उदाहरण आहे. 90 रुपये पेट्रोलची किंमत रिफायनरीवेळी 30 रुपये प्रति लिटर असते. त्यानंतर वेगवेगळ ट‌ॅक्स, पेट्रोल-पंप कमिशन आणि अन्य खर्च मिळून त्यात 60 रुपयांची वाढ होते. मला वाटतं पेट्रोलच्या किमती 40 रुपये प्रति लिटर असायला हव्यात, असं ते ट्विटमध्ये म्हणाले आहेत. 

सुब्रमण्यम स्वामी यांचे ट्विट चांगलेच ट्रेंड होत आहे. ही बातमी लिहित असताना त्यांच्या ट्विटला जवळपास 90 हजार लाईक आणि 21 हजारवेळा रिट्विट करण्यात आले आहे. आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी एक लिंक शेअर केली आहे. ज्यात इंधनाचे दर कमी झाल्यास अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होतो, असं सांगण्यात आलं आहे. 

स्वामी यांच्या ट्विटनंतर अनेकांनी ट्विट करत भाजप सरकारवर टीका केली आहे. एका यूझरने म्हटलंय की, भक्तांना समजत नाही की कोणाचे समर्थन करावे. 2012 मध्ये पेट्रोलची किंमत 67 रुपये झाली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोदींनी या मुद्द्यावरुन काँग्रेसवर जोरादार टीकास्त्र सोडले होते. त्यावेळी अनेक बॉलीवुड सेलिब्रिटींनीही ट्विट करुन यावर प्रतिक्रिया दिली होती. याच पार्श्वभूमीवर त्यांचे जूने ट्विट ट्रेंड करण्यात येत आहे.