Delhi News : गाडीत पेट्रोल भरणाऱ्या ८०० जणांना बसला १० हजार रुपयांचा दंड; दिल्लीत नेमकं काय सुरुय?

पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असताना कॅमेऱ्याचा छुप्या नजरेमुळे १० हजार रुपये ऑनलाईन दंड होऊ शकतो का? असा विचार तुम्ही कधी केला नसेल.
Petrol
Petrolsakal
Updated on

नवी दिल्ली - पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असताना कॅमेऱ्याचा छुप्या नजरेमुळे १० हजार रुपये ऑनलाईन दंड होऊ शकतो का? असा विचार तुम्ही कधी केला नसेल. परंतु दिल्लीमध्ये तसं घडलं आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या ८०० जणांना दंड भरावा लागला.

त्याचं कारण CCTV कॅमेराच्या मदतीने प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिल्ली सरकारच्या वाहतूक विभागाकडून हा अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. वाहतूक शाखेकडून राजधानी दिल्लीत चार पेट्रोल पंपावर असा उपक्रम राबवण्यात आला आहे. वाहनधारक आपल्या गाडीत इंधन भरताना हा CCTV कॅमेरा त्यांच्या वाहन क्रमांकाचा फोटो घेतो.

वाहन क्रमांकावरून त्या वाहनांचीही संपूर्ण माहिती वाहतूक विभागाला सहज प्राप्त होते. या माहितीच्या आधारे वाहनाचे प्रदूषण तपासणी प्रमाणपत्र आहे की नाही हे ही समजते. हा उपक्रम प्राथमिक स्वरूपात सुरु केला गेला आहे. यांच्यातील त्रुटी लक्ष्यात घेऊन हा उपक्रम आणखी प्रभावी कसा राबवता येईल याचा अभ्यास केला जाणार आहे.

काही माध्यमांनी या उपक्रमाची माहिती घेताना दिल्लीच्या कोणत्या भागात अशा प्रकारे उपक्रम सुरु आहे. हे विचारले असता वाहतूक विभागाने माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला. माहिती दिल्यास लोक अशा पंपावर इंधन भरण्यासाठी जाणार नाहीत, आणि यामुळे पंपधारकाचे आर्थिक नुकसान होऊ शकते. असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.

या उपक्रमासाठी वाहतूक विभागाला जास्त काही खर्च करण्याचीही आवश्यकता नाही. आधीपासूनच पंपावर असलेल्या CCTV कॅमेऱ्यांची यासाठी मदत घेतली जात आहे. या कॅमेरामध्ये वाहन क्रमांक सुस्पष्ट दिसतो. त्या कॅमेऱ्याने टिपलेली छायाचित्र पेट्रोल पंपासह दिल्ली सरकारच्या वाहतूक विभागाच्या सीपीयूमध्ये पाठवली जातात. बाकीचे काम कॉम्प्युटरच्या माध्यमातून केले जाते.

प्रदूषण तपासणी प्रमाणपत्र नसल्यास आपोआप दंड बसणार

असा अनोखा उपक्रम राबवणारे दिल्ली देशातील पाहिले राज्य आहे. असे वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका महिन्यात जवळपास ८०० वाहनांवर दंडात्मक कारवाई झाली असून, आता कॅमेराची संख्या ४ वरून २५ करण्यात येणार आहे. आणि आगामी काळात ही संख्या ५०० पर्यंत वाढवली जाईल.

दिल्लीमध्ये प्रदूषणाची समस्या वाढण्यामागे प्रदूषण करणाऱ्या वाहनांचा वाटा अधिक आहे यामुळे असा उपक्रम राबवला आहे. असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com